शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

HSC Result2024: विभागात कोल्हापूर जिल्हा अव्वल, सातारा द्वितीय तर सांगलीचा तृत्तीय क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 13:59 IST

साडेआठ हजार विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागाने ९४.२४ टक्के निकालासह राज्यात चौथा क्रमांक पटकाविला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ०.९६ टक्क्यांनी निकालात वाढ झाली असली तरी दोन स्थानांनी विभागाचा क्रमांक घसरला आहे. गतवर्षी कोल्हापूर विभागाने ९३.२८ टक्के निकालासह राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला होता. दरम्यान, कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला. कोल्हापूरचा ९५.६६ टक्के निकाल लागला. सातारा जिल्ह्याने ९३.६३ टक्के गुणांसह द्वितीय, तर ९२.६८ टक्के गुणांसह सांगली तृतीय ठरला.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. कोल्हापूर विभागाच्या निकालाबाबत मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील ८६१ कनिष्ठ महाविद्यालयांमधील १ लाख १४ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. १७५ केंद्रांवर झालेल्या या परीक्षेत १ लाख ७ हजार ७४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल ९५.६६, सातारा जिल्ह्याचा निकाल ९३.६३ तर सांगली जिल्ह्याचा निकाल ९२.६८ टक्के लागला.

दृष्टिक्षेपात विभागाचा निकालजिल्हा  -   प्रविष्ट विद्यार्थी  -  उत्तीर्ण विद्यार्थी  -  टक्केवारीकोल्हापूर -  ४९२१०  -  ४७०७६  -  ९५.६६सातारा -  ३३७८९  - ३१६३७  - ९३.६३सांगली-   ३१३२० -  २९०२८ -  ९२.६८

मुलींची बाजीकोल्हापूर विभागात ५३ हजार ७८१ मुलींनी बारावीची परीक्षा दिली. यापैकी ५२ हजार १७५ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.०१ टक्के आहे, तर विभागात ६० हजार ५३८ मुलांपैकी ५५ हजार ५६६ मुले उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९१.७८ टक्के इतके आहे.

साडेआठ हजार विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीतविभागात ८ हजार ५६३ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत प्रावीण्यासह प्रथम श्रेणी मिळवली आहे. ३२ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. ५३ हजार ३८ विद्यार्थ्यांनी ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुणांची कमाई केली. ३५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या १३ हजार ६७८ इतकी आहे. दरम्यान विभागात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इतर जिल्ह्यांपेक्षा कमी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHSC Exam Resultबारावी निकालSangliसांगलीSatara areaसातारा परिसर