शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

दादा लाड यांच्याकडेच "कोजिमाशी"; सत्तारूढ पॅनेलची विजयाच्या दिशेने वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 14:30 IST

काल, शनिवारी मोठ्या चुरशीने मतदान पार पडले. यावेळी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल केंद्रावर आसगावकर पॅनेलचे मतदार मतदानासाठी एकजुटीने आल्याने गोंधळ झाला असता पोलिसांनी सरांच्यावरच लाठीमार केला होता.

कोल्हापूर: जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या (कोजिमाशि) निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, ४००० मोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये दादा लाड यांच्या नेतृत्वखालील सत्तारूढ स्वाभिमानी आघाडीने ४०० ते ७०० मतांची लीड घेतली आहे. यामुळे पुन्हा एकदा लाड यांच्याकडेच सत्तेची सूत्र राहणार असल्याचे चित्र आहे. थोड्याच वेळात निकालाचे सर्व चित्र स्पष्ट होईल.

काल, शनिवारी मोठ्या चुरशीने मतदान पार पडले. यावेळी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल केंद्रावर आसगावकर पॅनेलचे मतदार मतदानासाठी एकजुटीने आल्याने गोंधळ झाला असता पोलिसांनी सरांच्यावरच लाठीमार केला होता.

‘कोजिमाशि’साठी शिक्षक नेते दादा लाड यांच्या नेतृत्वखालील सत्तारूढ स्वाभिमानी आघाडी व शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडी यांच्यात सरळ लढत होत आहे. गेले पंधरा दिवस ऐन पावसात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. पतसंस्थेच्या कारभाराबरोबरच व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली होती. साम, दाम, दंड या नीतीचा दोन्ही पॅनलकडून वापर झाला. त्यामुळे ‘सर’ कोणाच्या पदरात आपले मताचे दान टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार दादा लाड यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने आघाडी घेतली आहे.

पतसंस्थेचे ८५२० सभासद -पतसंस्थेचे ८५२० सभासद आहेत. त्यांपैकी सर्वाधिक १६७४ हे हातकणंगले तालुक्यातील आहेत. कागल ९२६, करवीर ८९२, तर कोल्हापूर शहरात ८३३ मतदार आहेत. त्यामुळे दोन्ही पॅनलकडून चार ठिकाणीच ताकद लावली गेली. 

तालुकानिहाय मतदान असे -कोल्हापूर शहर - ८३३, करवीर - ८९२, हातकणंगले - १६७४, कागल - ९२६, राधानगरी - ६२९, भुदरगड - ५५५, पन्हाळा - ७१७, शाहूवाडी - ३५४, शिरोळ - ७००, गडहिंग्लज - ४२१, आजरा - २०७, चंदगड - ३९०, गगनबावडा - १४०, स्वामी शिक्षण संस्था -७६, रयत शिक्षण संस्था- ६

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducationशिक्षणTeacherशिक्षकElectionनिवडणूक