शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
2
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
3
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
4
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
5
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
6
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
7
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
8
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
10
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
11
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
13
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
14
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
15
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
16
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
17
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
18
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
19
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
20
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
Daily Top 2Weekly Top 5

पक्षशिस्तीचा भंग; कोल्हापूर जिल्हा मजूर संघ उपाध्यक्षांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 19:08 IST

गत निवडणुकीत १४ जागा जिंकल्या होत्या

गडहिंग्लज : जिल्हा मजूर संघाच्या उपाध्यक्ष पदासह संचालकपदाचा राजीनामा देण्याच्या सूचनेचे पालन न करता पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे लक्ष्मण तोडकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती माजी आमदार राजेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.पत्रकात म्हटले आहे, २०२२ मध्ये तत्कालीन खासदार संजय मंडलिक, तत्कालीन आमदार प्रकाश आबिटकर, स्वत: मी व जिल्ह्यातील नेत्यांनी मिळून जिल्हा मजूर संघाची निवडणूक लढविली. त्याला सभासदांकडून चांगला प्रतिसाद मिळून १५ पैकी १४ जागा आपल्या पॅनेलने जिंकल्या.निवडणुकीनंतर संस्थेच्या अध्यक्षपदी प्रमोद पवार यांची, तर उपाध्यक्षपदी तोडकर यांची बिनविरोध निवड झाली. परंतु, अलीकडे संस्थेतील कारभाराच्या विरोधात संचालकांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. संचालकपदाचे राजीनामे देऊन १० संचालकांनी संस्थेवर प्रशासक नियुक्तीची मागणी केली आहे.या पार्श्वभूमीवर पक्षातील वरिष्ठ व कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेनुसार तोडकर यांनीही राजीनामा द्यावा, अशी सूचना पक्षाने त्यांना केली. त्यासाठी त्यांना पुरेसा वेळही दिला. परंतु, त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यांचे वागणे पक्षशिस्तीच्या चौकटीत बसत नसल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे, असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur NCP Leader Expelled for Violating Party Discipline Rules.

Web Summary : Laxman Todkar expelled from NCP for defying resignation order as labor union VP. Internal disputes led to demands for administrator appointment after union election victory. Todkar's refusal to resign violated party discipline.