शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

दिलासादायक चित्र। एकाबाबत काळजी, एक नियंत्रणात; घराबाहेर पडून धोका नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 19:17 IST

कोल्हापुरात दिलासादायक बाब अशी की, या साथीला अजून कोणी बळी पडलेले नाही. ‘लोकमत’ने या रुग्णांची स्थिती जाणून घेतली. त्यांची स्थिती चांगली आहे. ‘आता काय होतंय...’ म्हणून कोल्हापूरकरांनी घराबाहेर पडायचा धोका पत्करू नये.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे सहापैकी चार रुग्ण ठणठणीत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारपर्यंत एकूण सहा कोरोना संशयित रुग्ण आढळले असून, त्यांतील चौघांची प्रकृती चांगली आहे. एका रुग्णाची प्रकृती अजून धोक्याबाहेर नसली तरी नियंत्रणात आहे. एक रुग्ण वयोवृद्ध असल्याने व त्यांना अन्य आजारांची पार्श्वभूमी असल्याने त्यांचीच स्थिती काळजी करण्यासारखी असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात संशयित रुग्णांच्या संख्येत कोल्हापूर १५ क्रमांकावर आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत.

राज्यातील सोलापूर, बीड, नांदेड, परभणी, वर्धा, धुळे, भंडारा, गडचिरोली, नंदुरबार आणि चंद्रपूर या १० जिल्ह्यांत आतापर्यंत एकही संशयित रुग्ण सापडलेला नाही. कोल्हापुरात दिलासादायक बाब अशी की, या साथीला अजून कोणी बळी पडलेले नाही. ‘लोकमत’ने या रुग्णांची स्थिती जाणून घेतली. त्यांची स्थिती चांगली आहे. ‘आता काय होतंय...’ म्हणून कोल्हापूरकरांनी घराबाहेर पडायचा धोका पत्करू नये.

कोरोना रुग्ण क्रमांक 1

१रुग्णाचा इतिहास : इस्लामपूर येथील कुटुंबीय सौदी अरेबिया येथे हज यात्रेला गेले होते. ते १३ मार्चला परतले. त्यानंतर त्यांचा नातेवाइकांशी संपर्क आला. त्यामध्ये पेठवडगावच्या २२ वर्षीय युवतीचा समावेश.२रुग्णालयात दाखल : तिच्या घशातील स्रावाची चाचणी केल्यानंतर २५ मार्च २०२० ला अहवाल पॉझिटिव्ह आला.३सध्या कुठे उपचार : तिच्यावर मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार.४अहवाल काय सांगतो : तिच्या १४ दिवसांनंतरच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने ती कोरोनामुक्त मानली जाते. सध्या तिला मिरज येथे संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे.५ सध्याची स्थिती : आता तिची प्रकृती चांगली आहे.

कोरोना रुग्ण क्रमांक 2

१रुग्णाचा इतिहास : पुणे येथील गुलटेकडी परिसरातील ३९ वर्षांची ही व्यक्ती २१ मार्च रोजी महालक्ष्मी एक्स्प्रेसने जनरल डब्यातून कोल्हापुरात. भक्तिपूजानगरमधील आपल्या बहिणीकडे वास्तव्य केले.२रुग्णालयात दाखल : काही दिवसांनी त्रास सुरू झाल्याने सीपीआर कोरोना कक्षामध्ये दाखल. २५ मार्चला कोरोना झाल्याचे स्पष्ट.३सध्या कुठे उपचार : सध्या उजळाईवाडी येथील ‘अथायु हॉस्पिटल’मध्ये उपचार घेत आहेत.४अहवाल काय सांगतो : त्यांचा १४ दिवसांनंतरच पहिला अहवाल निगेटिव्ह आला असून, दुसऱ्याची प्रतीक्षा आहे.५ सध्याची स्थिती : रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. त्यांचे सलगचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात येईल.

कोरोना रुग्ण क्रमांक 3

१रुग्णाचा इतिहास : भक्तिपूजानगर येथील ३९ वर्षीय पुण्याहून आलेल्या कोरोनाग्रस्त तरुणाच्या कोल्हापूरस्थित बहिणीलाही २८ मार्चला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट.२रुग्णालयात दाखल : उजळाईवाडीतील अथायु हॉस्पिटलमध्ये २८ मार्चला दाखल३सध्या कुठे उपचार : उजळाईवाडीतील अथायु हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहेत.४अहवाल काय सांगतो : त्यांचा १४ दिवसांनंतरचा घशातील स्राव घेण्यात आला असून त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.५सध्याची स्थिती : सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे. आज, रविवारी पुन्हा स्राव घेण्यात येईल. तो निगेटिव्ह आल्यास त्यांना रुग्णालयातून संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात येईल.

कोरोना रुग्ण क्रमांक 4

१रुग्णाचा इतिहास : सातारा येथे नातेवाइकाचे निधन झाले म्हणून सांत्वनासाठी गेलेल्या कसबा बावड्यातील मराठा कॉलनीतील ६३ वर्षांच्या वृद्धेला कोरोना झाल्याचे स्पष्ट. नातेवाइकांकडे जाऊन ती २८ मार्चला कोल्हापुरात आली.२रुग्णालयात दाखल : त्यानंतर प्रकृती बिघडल्याने खासगी व सेवा रुग्णालयात तिची तपासणी करण्यात आली. ४ एप्रिलला तिला कोरोना विशेष कक्षामध्ये दाखल केले.३सध्या कुठे उपचार : सध्या ‘सीपीआर’मधील कोरोना कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.४अहवाल काय सांगतो : त्यांचा ५ एप्रिलला अहवाल पॉझिटिव्ह आला. १४ दिवसांनंतर त्यांच्या पुन्हा चाचण्या घेण्यात येतील.५सध्याची स्थिती : प्रकृती स्थिर, परंतु धोका कायम; कारण रुग्णास वयोमानानुसार व अन्य आजारांचीही पार्श्वभूमी.

कोरोना रुग्ण क्रमांक 5१रुग्णाचा इतिहास : शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील महावितरणमध्ये आॅपरेटर म्हणून नोकरीस आलेला हा ३० वर्षीय तरुण नमाज पढण्यासाठी दिल्लीत मरकजला गेला होता. तेथून आल्यामुळेच त्यास पन्हाळा येथे संस्थात्मक अलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आले व प्रवासाची पार्श्वभूमी असल्याने त्याच्या घशातील स्राव घेण्यात आला.२रुग्णालयात दाखल : अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या तरुणास ९ एप्रिलला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.३सध्या कुठे उपचार : सध्या सीपीआरमध्ये कोरोना कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.४अहवाल काय सांगतो : १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा चाचण्या घेण्यात येतील.५सद्य:स्थिती : प्रकृती नियंत्रणात, अन्य कोणत्याच आजाराची पार्श्वभूमी नाही; परंतु ‘सीपीआर’ची यंत्रणा लक्ष ठेवून.

कोरोना रुग्ण क्रमांक 6१रुग्णाचा इतिहास : शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या आईसही कोरोना झाल्याचे स्पष्ट. त्या ४९ वर्षांच्या आहेत.२रुग्णालयात दाखल : ९ एप्रिलला पॉझिटव्ह आल्यानंतर त्याच दिवशी त्याच्या घरातील सदस्यांसह संपर्कात आलेल्यांना ‘सीपीआर’मध्ये आणून तपासणी करून घशातील स्राव घेतले. त्याचा अहवाल ११ एप्रिलला पहाटे आला असून, त्याच्या आईला कोरोना झाल्याचे स्पष्ट.३सध्या कुठे उपचार : पहाटे अहवाल आल्यानंतर २० मिनिटांमध्ये या महिलेला कोरोना रुग्ण कक्षातून कोरोना अतिदक्षता कक्षामध्ये हलविल्यानंतर उपचार सुरू.४अहवाल काय सांगतो : पहिला अहवाल पॉझिटिव्ह असून १४ दिवसांनंतर पुन्हा चाचणी.५सध्याची स्थिती : प्रकृती नियंत्रणात, अन्य कोणत्याच आजाराची पार्श्वभूमी नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय