कोल्हापूर जिल्ह्यात सव्वा कोटीचा ध्वज निधी जमा : सुभाष सासणे यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 16:59 IST2018-11-13T16:49:24+5:302018-11-13T16:59:28+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ध्वजदिन निधी संकलन १ कोटी२८ लाख झाले असून उर्वरीत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण समाजाने ध्वजनिधीसाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासणे यांनी मंगळवारी येथे केले.

कोल्हापूर जिल्ह्यात सव्वा कोटीचा ध्वज निधी जमा : सुभाष सासणे यांचे आवाहन
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ध्वजदिन निधी संकलन १ कोटी२८ लाख झाले असून उर्वरीत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण समाजाने ध्वजनिधीसाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासणे यांनी मंगळवारी येथे केले.
आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचाविनियोग केला जातो. समाजातील दानशुर व्यक्ती आणि संस्थांनी ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करावी.
कोल्हापूर जिल्ह्यासाठी यंदा १कोटी ६० लाखाचे उद्दिष्ट असून आतापर्यत १ कोटी २८ लाखाचा निधी जमा झाला आहे. उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी या प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.