शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा बँक राबविणार "आई" महिला पर्यटन धोरण, १५ लाखांपर्यंत कर्जाचा मिळणार व्याज परतावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:00 IST

कोणत्या व्यवसायासाठी महिला कर्ज मिळणार....जाणून घ्या

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाराष्ट्र शासनाचे "आई" हे महिलापर्यटन धोरण राबविणार आहे. पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला पाठबळ देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. पर्यटन व्यवसायातील पंधरा लाखांपर्यंत कर्जाचा व्याज परतावाही पर्यटन संचालनालयाकडून दिला जाणार आहे.या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला जिल्ह्यातील असणे आवश्यक. लाभार्थीचे बँक खाते आधार लिंक असावे. संबंधित पर्यटन व्यवसाय महिलेच्या मालकीचा व त्यांनी चालविलेला असावा. व्यवसायात ५० टक्के व्यवस्थापकीय मालकी व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक. महिला अर्जदारांनी विहित नमुन्यात ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज केल्यानंतर त्यांना पर्यटन संचालनालयाकडून पात्रता प्रमाणपत्र दिले जाईल. त्या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे. व्यवसाय सुरू झाल्याच्या फोटोसह कर्जाची नियमित परतफेड करणे आवश्यक राहणार आहे.

या व्यवसायासाठी महिला कर्ज मिळणार....

  • कॅरॅमॅन : राहण्यासाठी व प्रवासासाठी सुसज्ज फिरते वाहन
  • टूर अँड ट्रॅव्हल एजन्सी : प्रवास, निवास व संपूर्ण टूर पॅकेज सेवा पुरवणारी संस्था.
  • कृषी पर्यटन केंद्र : शेती व ग्रामीण जीवनाचे अनुभव देणारी पर्यटन स्थळे.
  • होम स्टे- ग्रामीण होम स्टे, शहरी होम स्टे, थीम असलेले होम स्टे, होम स्टेचे नूतनीकरण
  • रेस्टॉरंट : जेवणासाठी पूर्ण सेवा देणारे ठिकाण
  • आर्ट अँड क्राफ्ट व्हिलेज : स्थानिक कला, वस्तू व हस्तकलेचे दर्शन व विक्रीचे ठिकाण

राज्य सरकारचे महिला केंद्रित असे महिला पर्यटन धोरण जिल्हा बँकेने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणाच्या माध्यमातून महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग आणि त्यांच्या आर्थिक विकासाचा स्तरही उंचावेल. या धोरणाच्या माध्यमातून केडीसीसी बँक जिल्ह्यातील महिलांना नवीन उद्योगाकरीता व जुना व्यवसाय वाढविण्याकरिता प्राधान्य देणार आहे. - हसन मुश्रीफ (अध्यक्ष जिल्हा बँक)

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Bank to Implement Women's Tourism Policy, Offers Loan Interest Refunds

Web Summary : Kolhapur District Bank will implement the "Aai" women's tourism policy, supporting female entrepreneurship. Loans up to ₹15 lakhs for tourism businesses owned and operated by women are eligible for interest refunds from the Directorate of Tourism, fostering economic empowerment.