कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन निवडणूक : गावडे-देसाई पॅनेलमध्ये चुरस वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 17:44 IST2019-04-27T17:43:03+5:302019-04-27T17:44:09+5:30
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत मुदतीत कोणीही अर्ज माघार न घेतल्याने १५ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन निवडणूक : गावडे-देसाई पॅनेलमध्ये चुरस वाढली
कोल्हापूर : जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत मुदतीत कोणीही अर्ज माघार न घेतल्याने १५ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले.
मंगळवारी (दि. ३०) सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी सहानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. सत्तारूढ गटाकडून रणजित गावडे आणि विरोधी प्रशांत देसाई या दोन पॅनेलमध्ये ही लढत होत आहे. मतदानासाठी अवघे तीनच दिवस राहिल्याने पॅनेलचे नेते जिल्ह्यातील मतदार पिंजून काढत आहेत.
जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत दोन्ही पॅनेलच्या पॅनेलचे एकूण ३० व दोन अपक्ष उमेदवारांत ही लढत होत आहे. मतदार हे संपूर्ण कोल्हापूर जिल्हाभर असल्यानेच पॅनेलचे नेते यांनी जिल्ह्यातील वकिलांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. दोन्हीही पॅनेलकडून प्रचाराने गती घेतली आहे. खंडपीठ हा मुद्दा या निवडणुकीत प्राधान्याने पुढे केला जात आहे.
मंगळवारी (दि. ३०) सकाळी १० वाजता बार असोसिएशनच्या सभागृहात मतदानाला प्रारंभ होणार असून, सायंकाळी सहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होऊन रात्री आठ वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. सुभाष पिसाळ म्हणून काम पाहत आहेत.