शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कोल्हापूर : निर्ढावलेल्या हातांनी ‘महसूल’ची प्रतिमा डागाळली : लाच प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 2:43 PM

थेट तहसीलदारच लाचप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडल्याने संपूर्ण महसूल विभागाचीच प्रतिमा डागाळली आहे. गेल्या दोन महिन्यांंतील हा दुसरा प्रकार आहे. या विभागात आलेली शिथिलता, वरिष्ठांचा न राहिलेला धाक आणि ‘माझं कोण काय बिघडवतंय?’ या अतिआत्मविश्वासमुळेच लाच घेण्यासाठी हात निर्ढावल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देनिर्ढावलेल्या हातांनी ‘महसूल’ची प्रतिमा डागाळली लाच प्रकरण : दोन महिन्यांतील दुसरा प्रकार

प्रवीण देसाई

कोल्हापूर : थेट तहसीलदारच लाचप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडल्याने संपूर्ण महसूल विभागाचीच प्रतिमा डागाळली आहे. गेल्या दोन महिन्यांंतील हा दुसरा प्रकार आहे. या विभागात आलेली शिथिलता, वरिष्ठांचा न राहिलेला धाक आणि ‘माझं कोण काय बिघडवतंय?’ या अतिआत्मविश्वासमुळेच लाच घेण्यासाठी हात निर्ढावल्याचे दिसत आहे.कागलचे तहसीलदार किशोर घाडगे यांच्यासह दोघे कर्मचारी अडीच लाखांच्या लाचप्रकरणी गुरुवारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले. यामुळे खळबळ माजली आहे. एरवी अशा प्रकरणात छोटे मासे म्हणून कर्मचारीच समोर यायचे; पण कागलच्या प्रकरणात थेट तहसीलदारांच्या रूपानेच मोठा मासा अडकल्याने महसूल खात्याची प्रतिमा किती खालावली आहे, हे सिद्ध होते. या प्रकरणात सापडलेले तहसीलदार हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे.ज्यांना चांगला पगार आहे, समाजात चांगला मान आणि प्रतिष्ठा आहे, त्यांच्याकडून अशा पद्धतीने स्वत:सह संपूर्ण खात्याची प्रतिमा धुळीस मिळवायचे प्रकार होणे ही शरमेची बाब आहे. एम.पी.एस.सी.सारखी खडतर परीक्षा ही जीव तोडून मेहनत करून व रात्रंदिवस अभ्यास करून उत्तीर्ण होऊन या पदावर यायचे, ते यासाठीच का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही.आपण तालुक्याचे जणू सर्वेसर्वाच आहोत; माझे कोण काय बिघडविणार, याच आत्मघातकी मानसिकतेतून लाच घेण्यासारखा निर्ढावलेपणा आल्याचे दिसत आहे. यावरून खात्यावर वरिष्ठांचाही धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे.गेल्या दोन महिन्यांपूर्र्वीही जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याला बंदुकीच्या परवान्यासाठी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. यामुळे संपूर्ण महसूल वर्तुळात खळबळ माजली होती. याची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. असे प्रकार होऊ नयेत हाच त्यामागील उद्देश होता; परंतु यामुळे काहीच फरक पडला नसल्याचे कागलच्या प्रकरणावरून दिसत नाही.

महसूलमंत्र्यांनी दिला होता इशारामहाराष्ट राज्य तलाठी संघाचे २४ डिसेंबर २०१७ रोजी कोल्हापुरात अधिवेशन झाले. यामध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असा इशारा तलाठ्यांसह महसूल अधिकाऱ्यांना दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शकतेच्या बाबतीत टोकाचे आग्रही आहेत. गेल्या वर्षभरात जिल्'ात २०, तर राज्यात ३०० हून अधिक तलाठी लाचखोरीत निलंबित झाले आहेत. त्यामुळे अंतर्मुख व्हा, असा सल्लाही मंत्री पाटील यांनी दिला होता; परंतु त्यांचा इशाराही धाब्यावर बसविण्याचा प्रकार या निमित्ताने झाल्याची चर्चा आहे.

महसूल कर्मचारी संघटना करणार प्रबोधनलाच प्रकरणामुळे संपूर्ण खात्याची बदनामी होत आहे. यासाठी महसूल कर्मचारी संघटनेतर्फे यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्हाभर दौरे काढून कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्याविषयी मागणी केली होती. अद्याप त्याला मंजुरी मिळाली नसली तरी पुन्हा अशी मागणी केली जाणार आहे. तलाठ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगले पगार असताना असे प्रकार करून खात्याची बदनामी करू नका, असे प्रबोधन केले जाणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार