शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

कोल्हापूर : दिनकरची पतौडी खणीत स्कूबा डायव्हींगचे प्रात्यक्षिके, ‘बुलढाणा अर्बन’ ची जीवरक्षकाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 5:02 PM

जीवरक्षक दिनकर कांबळेस बुलडाणा अर्बन को-आॅप के्रडीट सोसायटीतर्फे दोन लाख रुपये किंमतीचे परदेशी बनावटीचे स्कुबा डायव्हींग किट देण्यात आले. त्याची प्रात्यक्षिके शुक्रवारी दुपारी दिनकरने रंकाळ्याजवळील पतौडी खण येथे उपस्थितांना दाखविली.

ठळक मुद्देदिनकरची पतौडी खणीत स्कूबा डायव्हींगचे प्रात्यक्षिके ‘बुलढाणा अर्बन’ ची जीवरक्षकाला मदत

कोल्हापूर : जीवरक्षक दिनकर कांबळेस बुलडाणा अर्बन को-आॅप के्रडीट सोसायटीतर्फे दोन लाख रुपये किंमतीचे परदेशी बनावटीचे स्कुबा डायव्हींग किट देण्यात आले. त्याची प्रात्यक्षिके शुक्रवारी दुपारी दिनकरने रंकाळ्याजवळील पतौडी खण येथे उपस्थितांना दाखविली.दिनकर हा गेले अनेक वर्षे आपत्तीत सापडलेल्या नागरीकांची विनामोबदला सेवा करुन त्यांचे प्राण वाचवित आला आहे. त्याच्या कामगिरीची दखल घेत बुलडाणा अर्बन संस्थेने त्याचा डिसेंबर २०१७ मध्ये विशेष गौरव केला होता. त्यात त्याला त्याच्या जीव रक्षण कामात उपयोगी येणारे आॅस्ट्रेलियन बनावटीचे स्कुबा डायव्हींग किट देण्याचे अभिवचन दिले होते. त्यानूसार हे किट शुक्रवारी त्याला दिले. त्याची प्रात्याक्षिके दिनकर याने रंकाळ्याजवळील पतौडी खण येथे दाखविली.

बुलडाणा अर्बन को-आॅप सोसायटीने दिलेल्या स्कुबा डायव्हिग किट मध्ये रंकाळा तलाव पतौडी खण येथे प्रात्यक्षिके दाखविताना जीवरक्षक दिनकर कांबळे .

यावेळी त्याने १५० फुट खोलपर्यंत जाऊन बुडालेला मृतदेह कसा बाहेर काढला जातो. त्यात स्कूबा डायव्हींग किट किती बहुमुल्य आहे. याची प्रात्यक्षिके दाखविली. त्याला दिलेल्या किटमध्ये बीसीडी गणवेश हा पाण्यात त्याचे शरीराचे तापमान नियंत्रणात राखते. तर त्या किटमध्ये आॅक्सिजन सिलेंडर, प्रेशर गेज, पाण्यातील दिसण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या चष्मा,विशिष्ट प्रकारचे बुट, आदींचा वापर कसा केला जातो हेही त्याने उपस्थितांना दाखविले.

दिनकरने आतापर्यंत सव्वा चार हजाराहून अधिक मृतदेह पाण्यातून बाहेर काढले असून ६३० हून अधिक जणांचे प्राणही वाचविले आहेत. या कार्याची दखल घेत ‘बुलडाणा अर्बन’ परिवाराने त्याला हे आॅस्ट्रेलियन बनावटीचे स्कूबा डायव्हींग किट दिले आहे. विशेष म्हणजे हे किट कसे वापरायचे व त्यातून इतरांचे प्राण व पाण्याच्या आतील जीवसृष्टीचा अभ्यास व त्याचे निरीक्षण कसे करायचे यासाठी उपयोगीआहे.

आतापर्यंत दिनकर या किटशिवाय स्वत:चा जीव धोक्यात घालून हे काम करीत होता. त्यात या किटमुळे त्याच्या या अनोख्या पण समाजउपयोगी कामात मोठा उपयोग होणार आहे. कारण अशा प्रकारचे किट प्रथमच कोल्हापूरात उपलब्ध झाले आहे.

यावेळी बुलडाणा अर्बन चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे,वि•ाागीय व्यवस्थापक अविनाश कुंभार, वरिष्ठ व्यवस्थापक गुरुनाथ लोखंडे, पुणे शाखा व्यवस्थापक योगिनी पोफळे, शैलेंद्र हावळ, बाळासाहेब पाटील, बाबुराव थोरात, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते. 

 

दोन महिन्यांच्या स्कूबा डायव्हींगचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मी पुर्ण केले आहे. या बीसीडी जॅकेट स्कूबा डायव्हींग किटचा वापर आपत्तीकालीन परिस्थितीत करता येणार आहे. यापुर्वी पाण्यात बुडालेले मृतदेह काढताना ५० ते १०० फुटापर्यंत विना आॅक्सिजन जात होतो. त्यात मर्यादा होत्या ठराविक अंतरापर्यंत जीव धोक्यात घालून मी ते मृतदेह बाहेर काढीत होतो. मात्र, बुलडाणा अर्बन परिवाराने माझी दखल घेत मला दोन लाख किंमतीचे परदेशी बनावटीचे हे किट दिले आहे. त्यामुळे मला १२५ ते १५० फुटापर्यंत खाली जाता येणार आहे. त्याचा पुरेपुर वापर जिल्ह्यातील पाण्यात बुडालेल्या मृतदेहांसाठी व बुडणाऱ्यांना वाचविण्यासाठी करेन.- दिनकर कांबळे,जीवरक्षक 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक