शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Kolhapur: सकल मराठा समाजाचे धरणे आंदोलन स्थगित, मुंबईच्या आंदोलनात हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार 

By सचिन भोसले | Updated: December 24, 2023 15:51 IST

Kolhapur:ऐतिहासिक दसरा चौकामध्ये गेली ५७ दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता सुरू असलेले सकल मराठा समाजाचे धरणे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय समन्वयाकांतर्फे रविवारी घेण्यात आला.

- सचिन भोसले कोल्हापूर - ऐतिहासिक दसरा चौकामध्ये गेली ५७ दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता सुरू असलेले सकल मराठा समाजाचे धरणे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय समन्वयाकांतर्फे रविवारी घेण्यात आला. मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २० जानेवारीच्या आंदोलनात मोठया ताकदीने व हजारोंच्या सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. त्यासाठी गावागावातील समाज बांधवाशी संपर्क साधून प्रबोधन केली जाणार आहे.

वसंतराव मुळीक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातून मराठा समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने २० जानेवारी २०२४ होणाऱ्या  मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी व्हायचे आहे. त्यासाठी जिल्हयातील समाज बांधवांमध्ये जाउन त्या विषयी जनजागृती करण्यात येईल. मराठयांना जरांगे पाटील यांच्या रूपाने प्रामाणिक नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ताकदीने राहू.

ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, क्युरेटिव्ह पिटिशनबाबत शासनाकडून फसवणूक सुरू आहे. त्याबाबत आपली दिशाभूल केली जात आहे. आताची लढाई जिंकली नाही, तर पुन्हा असा लढा देणे शक्य होणार नाही. रस्त्यावरील लढाई बरोबरच कायदेशीर लढा ही दयायला हवा.

विजय देवणे म्हणाले, जिल्ह्यात मुंबईतील आंदोलनाबाबात जनजागृती करूया. किमान १० हजार समाज बांधव मुंबईतील आंदोलजात सहभागी व्हावेत, यासाठी प्रयत्न करूया. यावेळी ॲड. सुरेश कुराडे, सुभाष जाधव, उदय लाड, चंद्रकांत पाटील, श शिकांत पाटील, शाहीर दिलीप सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.

मान्यवरांचा पाठींबासंजयबाबा घाटगे यांनी भेट देऊन आंदोलनास पाठींबा व्यक्त केला. तर हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांनी तालीम संघातर्फे या आंदोलनास पाठींबा व्यक्त केला. तसेच गेल्या ५७ दिवसांत पाठींबा दिलेल्या सर्व घटकांचे आभार समन्वयकांतर्फे मानण्यात आले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर