शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कर्नाटकातील भाविकाचा पंचगंगा नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 17:57 IST

कोल्हापूर : भावाच्या लग्नाचा नवस फेडण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील भाविकाचा पंचगंगा नदीपात्रात अंघोळ करताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. प्रभाकर संजय कांबळे (वय २२, रा. महेकर, ता. भालकी, जि. बिदर) असे त्याचे नाव आहे.डोळ्यासमोर प्रभाकर बुडालेला पाहून त्याच्या भावासह नातेवाईकांना मानसिक धक्का बसला. त्यांनी सीपीआर रुग्णालय आवारात केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा ...

ठळक मुद्देकर्नाटकातील भाविकाचा पंचगंगा नदीत बुडून मृत्यूनदीपात्रात अंघोळ करताना बुडाला

कोल्हापूर : भावाच्या लग्नाचा नवस फेडण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील भाविकाचा पंचगंगा नदीपात्रात अंघोळ करताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. प्रभाकर संजय कांबळे (वय २२, रा. महेकर, ता. भालकी, जि. बिदर) असे त्याचे नाव आहे.

डोळ्यासमोर प्रभाकर बुडालेला पाहून त्याच्या भावासह नातेवाईकांना मानसिक धक्का बसला. त्यांनी सीपीआर रुग्णालय आवारात केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. मंगळवारी सकाळी ही घटना घडली.अधिक माहिती अशी, प्रभाकर कांबळे हा गावात शिवणकाम करीत होता. त्याचा थोरला भाऊ महादेव याचे दि. ८ मे रोजी लग्न झाले. भावाच्या लग्नाचा नवस फेडण्यासाठी तो नववधूंसह नातेवाईकांसोबत ‘अंबाबाई’ व ‘जोतिबा’ दर्शनासाठी मंगळवारी पहाटे कोल्हापूरला आला होता.पंचगंगा नदी घाटावर अंघोळीसाठी सर्वजण उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने प्रभाकर बुडाला. आजूबाजूच्या नातेवाईकांची आरडाओरड ऐकून नेहमी याठिकाणी अंघोळीला येणारे जीवरक्षक उदय निंबाळकर यांनी शोध घेतला असता, अवघ्या पंधरा मिनिटांत प्रभाकरचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.

त्यानंतर शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात आणला. नवस फेडायला आलेल्या कांबळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात