शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

कोल्हापूर :  वीज दरवाढीविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 13:49 IST

वीज दरवाढ कमी करण्यासाठी एकजुटीने तीव्र लढा देण्याचा निर्धार जागर फौंडेशनतर्फे आयोजित वीज दरवाढविरोधी राज्यस्तरीय परिसंवादामध्ये उद्योजक, शेतकरी, आदी घटकांच्या वतीने करण्यात आला. वीज दरवाढ तत्काळ कमी करावी; उद्योगक्षेत्रासाठी वीज अनुदान द्यावे, या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत लढा देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

ठळक मुद्दे वीज दरवाढीविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार१५ फेब्रुवारीपूर्वी राज्यव्यापी बैठक; जागर फौंडेशनतर्फे परिसंवाद

कोल्हापूर : वीज दरवाढ कमी करण्यासाठी एकजुटीने तीव्र लढा देण्याचा निर्धार जागर फौंडेशनतर्फे आयोजित वीज दरवाढविरोधी राज्यस्तरीय परिसंवादामध्ये उद्योजक, शेतकरी, आदी घटकांच्या वतीने करण्यात आला. वीज दरवाढ तत्काळ कमी करावी; उद्योगक्षेत्रासाठी वीज अनुदान द्यावे, या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत लढा देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमधील मिनी सभागृहात राज्यस्तरीय परिसंवाद घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे होते. या परिसंवादात वीजतज्ज्ञ, विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी सहभागी झाले. वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणाले, राज्य सरकारने ३४०० कोटींची तातडीची मदत म्हणून अनुदान देण्याची गरज आहे. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने अशा पद्धतीने तातडीची मदत म्हणून सहा हजार कोटींचे अनुदान दिले होते. वीजनिर्मिती, खरेदी, गळती आणि प्रशासकीय खर्चात कपात जर केली नाही, तर महावितरण भविष्यात निश्चित बंद पडेल. वीज दरवाढीविरोधात राज्यव्यापी लढ्याची दिशा ठरविण्यासाठी दि. १५ फेब्रुवारीपूर्वी सर्व जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजकांची बैठक घेण्यात येईल.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार म्हणाले, वीजदरवाढीबाबतच्या लढ्यात माझा पूर्ण ताकदीने सहभाग राहील. सरकारला वीजदर कमी करावाच लागेल. ‘कोल्हापूर चेंबर’चे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव म्हणाले, डिमांड चार्जेस कमी व्हावेत. वीज दरवाढीमुळे उद्योग चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. उद्योगमंत्र्यांनी दरवाढीचा फेरविचार करावा.

अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, वीजदरवाढ मागे घेण्यासाठी आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्या दृष्टीने सर्व घटकांनी संघटित होऊन लढा उभारण्याची गरज आहे. ‘जागर फौंडेशन’चे अध्यक्ष प्रा. बी. जी. मांगले यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी वीजदरवाढ मागे घेण्यासाठी उद्योजक, शेतकरी, व्यावसायिक, आदी घटकांनी एकजुटीने लढण्याची गरज आहे. या लढ्यात ‘जागर फौंडेशन’ सहभागी राहील.

या परिसंवादात ‘कोल्हापूर चेंबर’चे माजी अध्यक्ष आनंद माने, ‘गोशिमा’चे राजू पाटील, ‘मॅक’चे हरिश्चंद्र धोत्रे, निवृत्त कार्यकारी अभियंता तुकाराम भिसे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पारस ओसवाल, अरुण पाटील, गुलाबराव घोरपडे, रमेश पोवार, बाबासाहेब देवकर, प्रसाद बुरांडे, गोपाळ पटेल, नंदकुमार गोंधळी, सचिन तोडकर, अप्पासाहेब धनवडे, चंद्रकांत कांडेकरी, रितू लालवाणी, आदी उपस्थित होते. पीटर चौधरी यांनी प्रास्ताविक केले. सम्राट गोंधळी यांनी आभार मानले.कोण, काय, म्हणाले?

  1. आनंद माने (कोल्हापूर चेंबर) : शेतीला वीजपुरवठा करण्यासाठी अधिक खर्च होत असल्याचे सांगून महावितरणकडून वीज दरवाढ केली जात आहे. या दरवाढीमुळे उद्योग चालविण्याची कसरत करावी लागत आहे. शेजारील राज्यांच्या बरोबरीने आपल्या राज्यात वीजदर असणे आवश्यक आहे.
  2. राजू पाटील (स्मॅक) : महावितरणने पॉवर फॅक्टर पेनल्टीचा भार उद्योजक आणि ग्राहकांवर लादू नये. वीज दरवाढ मागे घ्यावी.
  3. उज्ज्वल नागेशकर (हॉटेल मालक संघ) : हॉटेल व्यवसायाला इंडस्ट्रीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार वीजदर लागू करणे, सवलती, अनुदान देणे आवश्यक आहे.
  4. विक्रांत पाटील (इरिगेशन फेडरेशन) : शेतकरी, उद्योजकांचे म्हणणे ऐकत नसेल, तर वीज नियामक आयोगाची आम्हाला गरज नाही.
  5. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात वीजगळती कमी असून बिलाची वसुली अधिक आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांतील तोटा भरून काढण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राला वेठीस धरले जात आहे. ऊर्जामंत्र्यांचा पश्चिम महाराष्ट्रावर राग आहे.

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर