शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कोल्हापूर : शिष्यवृत्ती, वसतिगृहातील समस्या मार्गी लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 4:13 PM

सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोल्हापुर शाखेने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे सोमवारी केली.

ठळक मुद्देशिष्यवृत्ती, वसतिगृहातील समस्या मार्गी लावण्याची मागणीअभाविपने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

कोल्हापूर : सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोल्हापुर शाखेने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे सोमवारी केली.राज्यामध्ये गत दोन वर्षापासून ओबीसी, एन.टी, एस.सी या प्रवगार्तील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्याप जमा झालेली नाही तसेच ती देण्यामध्ये होणारा विलंब व त्यातील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. तसेच राज्यातील शासकीय वसतिगृहामध्येही विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून त्या मार्गी लावाव्यात यासह अन्य मागण्यांसाठी अभाविपच्या कोल्हापूर शाखेने सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेतली.विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक श्रीनिवास सूर्यवंशी, ओंकार शिंदे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.या समस्यांबाबत अद्यापही तोडगा काढण्यास शासन असमर्थ ठरले असल्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करत या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात तसेच येत्या १५ दिवसांत शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना मिळाव्यात, अन्यथा, येत्या काळात शासनाला छात्रशक्तीच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे.या आहेत मागण्या१) गत दोन वषार्पासून ओबीसी, एन.टी, एस.सी या प्रवगार्तील शिष्यवृत्ती तसेच राजीव गांधी शोधवृत्ती, राष्ट्रीय शोधार्थी शोधवृत्ती, प्री मॅट्रिक व पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेली नाही.२) शासनाने या वर्षी शिष्यवृत्ती, ईबीसी, फ्रीशीपचे आॅनलाइन किंवा आॅफलाइन पद्धतीने अर्ज अद्यापही भरून घेतले नाहीत, ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.३) महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यासोबत शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घ्यावेत.४) प्री-मॅट्रिक व पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीमध्ये कमीत कमी २२५० तर जास्तीत जास्त १२००० रुपये प्रतिवर्षी मिळत आहे. पण महागाई व इतर खर्च लक्षात घेता सरकारने शिष्यवृत्तीची रक्कम १२००० प्रतिवर्ष करावी व त्याप्रमाणे वर्गवार अधिक शिष्यवृत्ती निश्चित करावी.५) शिष्यवृत्तीस मूल्य सूचकांकासोबत जोडावे म्हणजे शिष्यवृत्ती महागाई सोबत मूल्य वाढीत परिवर्तीत होईल.६) राजीव गांधी शोधवृत्ती अंतर्गत फक्त २०० रुपये विद्यार्थ्यांना शोधवृत्ती दिली जाते. संशोधनात्मक शिक्षण घेण्यासाठी या शोधवृत्तीमध्ये संख्येची वाढ करावी.७) सध्या राष्ट्रीय ओबीसी शोधवृत्ती ३०० विद्यार्थ्यांना दिली जाते, ती अपुरी आहे, यामध्ये लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यात यावी.८) सर्व शासकीय वसतिगृहात कायमस्वरूपी निवासी रेक्टर व सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी.९) वसतिगृहामध्ये अस्वच्छतेची वारंवार तक्रार असते, येथील स्वच्छतेसाठी सफाई कामगार नियुक्त करण्यात यावेत.१०) शासकीय वसतिगृहांची संख्या वाढवण्यात यावी.११) वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्टेशनरी भत्त्यामध्ये वाढ करावी, व तो भत्ता शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला लवकरात लवकर मिळावा.१२) आदिवासी विभागा अंतर्गत येणाऱ्या वसतिगृहामध्ये जेवणाची सोय करण्यात यावी.१३) शासकीय वसतिगृहात दूरदर्शन कक्ष, संगणक कक्ष, भोजन सभागृह, वाचन कक्ष, वॉटर प्युरिफिकेशन, व्यायाम शाळा यांची सोय करण्यात यावी.१४) सर्व वसतिगृहामध्ये कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर