शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

कोल्हापूर : रताळे, वरी, शाबूदाण्याला मागणी, महाशिवरात्रीमुळे बाजारात गर्दी : भाज्यांचे दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 3:20 PM

दोन दिवसांवर आलेल्या महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारच्या आठवडी बाजारात विशेषत : उपवासाच्या पदार्थांना मागणी होती. रताळे, फळांसह शाबूदाणा, वरी आणि शेंगदाणे, राजगिरा लाडू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची लगबग सुरू होती. दुसरीकडे, भाज्यांचे दर स्थिर होते तर कलिंगड, द्राक्षांसाठी गर्दी होती.

ठळक मुद्देरताळे, वरी, शाबूदाण्याला मागणी महाशिवरात्रीमुळे बाजारात गर्दी भाज्यांचे दर स्थिर

कोल्हापूर : दोन दिवसांवर आलेल्या महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारच्या आठवडी बाजारात विशेषत : उपवासाच्या पदार्थांना मागणी होती. रताळे, फळांसह शाबूदाणा, वरी आणि शेंगदाणे, राजगिरा लाडू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची लगबग सुरू होती. दुसरीकडे, भाज्यांचे दर स्थिर होते तर कलिंगड, द्राक्षांसाठी गर्दी होती.लक्ष्मीपुरीतील रविवारच्या आठवडी बाजारासह कपिलतीर्थ मार्केट, पाडळकर मार्केट, नार्वेकर मार्केट, आदी बाजारांत उपवासाच्या पदार्थांना जास्त मागणी होती. किरकोळ बाजारात रताळ्याचा प्रतिकिलो दर २० रुपये, शाबूदाणा ६० पासून ७२ रुपये, वरी ६० पासून ८० पर्यंत, तर शेंगदाणे ८० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत होते. राजगिरा लाडू (दहा नग) दर २० रुपये होता.त्याचबरोबर काजू ८०० ते एक हजार रुपयांपर्यंत, बदाम ५०० ते ८०० रुपयांच्या घरात, तर पिस्ता १६०० रुपये प्रतिकिलो होता. खारी २०० ते ४०० रुपये, सुके खोबरे १८० रुपये, तांदळाचे दर ४० रुपये ते १४० रुपयांपर्यंत, तर शेंगतेल १२५ रुपये असा प्रतिकिलोचा दर होता. तसेच कोबी, वांगी, ओली मिरची, टोमॅटो, कारली, भेंडी, वरणा, दोडका, काकडी, वाल, बिनीस, हिरवा टोमॅटो, दुधी भोपळा, गाजर, आले आणि मेथी, पालक व पोकळ्याचा दर स्थिर होता. ओल्या वाटाण्याचा दर कमी झाला आहे. तो १८ रुपये प्रतिकिलो असा होता. लिंबूची आवक वाढल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे. २२५ रुपयांना त्याचे चुमडे होते.फळबाजारात मोसंबी, माल्टा, चिक्कू, पेरू, सफरचंद, डाळिंब, अननसालाही मागणी वाढली आहे. द्राक्षे ६० रुपये, मोसंबी ५० ते ५५ रुपये, चिक्कू ३० रुपये, पेरू ४० ते ४५ रुपये, सफरचंद ८० ते १०० रुपयांच्या घरात होते. डाळिंब ४० रुपये प्रतिकिलो होते. विशेष म्हणजे स्ट्रॉबेरीला मागणी वाढली होती. बॉक्सचा दर १०० रुपये होता. एकंदरीत, सणामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी होती.

रताळ्यांची आवक वाढलीमहाशिवरात्री सणानिमित्त घाऊक बाजारात रताळ्यांची आवक वाढल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे. रताळ्यांचा दर दहा किलोंना १८० रुपये असा होता. ऐन सणात रताळ्यांचा दर उतरल्याने ग्राहकांना याचा फायदा झाला.

कांदा-बटाटा, गुळाचा दर स्थिरकांदा, बटाट्यासह लसूण, गूळरव्यांचा दर स्थिर होता. कांदा २० रुपये, बटाटा दहा रुपये, तर लसूण २२ ते २५ रुपये असा प्रतिकिलो दर होता. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार