शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

कोल्हापूर : ‘वसंतदादा’ कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाबाबत दोन दिवसांत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 20:27 IST

सांगली येथील वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रॉव्हिडंट फंडाच्या थकीत रकमेसाठी मंगळवारी कोल्हापूर येथील फंडाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत येत्या दोन दिवसांत फंडाबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त सौरव प्रसाद यांनी दिले.

ठळक मुद्दे‘वसंतदादा’ कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाबाबत दोन दिवसांत निर्णयआयुक्तांचे शिष्टमंडळाला आश्वासन : कर्मचाऱ्यांचा कार्यालयाच्या दारात ठिय्या

कोल्हापूर : सांगली येथील वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रॉव्हिडंट फंडाच्या थकीत रकमेसाठी मंगळवारी कोल्हापूर येथील फंडाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत येत्या दोन दिवसांत फंडाबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त सौरव प्रसाद यांनी दिले.‘वसंतदादा’ कारखाना गेल्या १५ वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे. मार्च २०११ पासून सदर कारखान्याने फंडाची रक्कम कार्यालयाकडे जमा केली नाही. तोपर्यंत जुलै २०१७ पासून दत्त इंडिया कंपनीने कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला आहे. तत्पूर्वीच्या थकीत फंडाची रक्कम नेमकी कोणी द्यायची, हा पेच आहे.

मार्च २०११ पासून न भरलेली रक्कम, दंड व व्याजाची २८ कोटी रुपये देय आहे. याबाबत साखर कामगार युनियन, सांगलीने अनेक वेळा फंडाच्या कार्यालयाकडे पाठपुरावा केला; पण तो बेदखल करण्यात आल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कोल्हापूर येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

कर्मचाऱ्यांना न्याय देत नाही तोपर्यंत कार्यालयाच्या दारातून न हलण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. दुपारी आयुक्त सौरव प्रसाद यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. येत्या दोन दिवसांत प्रलंबित फंडाची रक्कम भरण्याचे आदेश सबंधितांना देण्याचे आश्वासन सौरव प्रसाद यांनी यावेळी दिले. जर या कालावधीत फंडाची रक्कम वर्ग झाली नाही तर १ मे रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला.यावेळी युनियनचे सरचिटणीस प्रदीप श्ािंदे, अध्यक्ष पोपटराव पाटील, विलास पाटील, शिवाजी पाटील, अशोक साळुंखे, सर्जेराव भोसले, सुनील घोरपडे, संजय खराडे, राजू मुल्लाणी, रामभाऊ पाटील, चंद्रकांत पाटील, दिलीप गोरे, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरSangliसांगली