शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : थकीत ‘एफआरपी’ बाबत दोन आठवड्यात निर्णय घ्या, उच्च न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 16:37 IST

साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपी बाबत ‘आंदोलन अंकुश’ संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, यावर दोन आठवड्यात योग्य निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने साखर आयुक्तांना दिले आहेत. अशी माहिती संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देथकीत ‘एफआरपी’ बाबत दोन आठवड्यात निर्णय घ्याउच्च न्यायालयाचे साखर आयुक्तांना आदेश ‘आंदोलन अंकुश’चा पाठपुरावा

कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपी बाबत ‘आंदोलन अंकुश’ संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, यावर दोन आठवड्यात योग्य निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने साखर आयुक्तांना दिले आहेत. अशी माहिती संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.चुडमुंगे म्हणाले, शुगरकेन कंट्रोल कायद्यानुसार ऊस तुटल्यापासून १४ दिवसात एफआरपी प्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे. याबाबत प्रादेशिक साखर सहसंचालक, साखर आयुक्तांच्या पातळीवर निवेदने दिली, आंदोलने केली पण त्यांनी न्याय दिला नाही. ऊस जाऊन दोन महिने झाले तरी हातात पैसे न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

यासाठी ‘अंकुश’च्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन आयुक्तांनी दोन आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. चौदा दिवसानंतर १५ टक्के व्याजाने शेतकऱ्यांना पैसे आदा करावे लागणार आहेत.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी ८०० कोटीची एफआरपी थकवली असून त्याचे व्याज ३० कोटी शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे. याबाबत सोमवारी आयुक्तांची भेट घेणार असून दोन आठवड्यात कार्यवाही झाली नाहीतर आयुक्तांविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे. विकास शिखरे, रघूनाथ पाटील, प्रभाकर बंडगर, मनोज राजगिरे, आशाराणी पाटील उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा हातभारन्यायालयीन लढाई करण्यासाठी जिल्ह्यातील आठ ते नऊ हजार शेतकऱ्यांनी वर्गणी काढून दिली होती. त्याच्या माध्यमातून आम्ही लढाई जिंकल्याचे चुडमुंगे यांनी सागिंतले.

यड्रावकर पैसे द्या मग ‘हल्लाबोल’ करा‘शरद’चे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ मधील शेतकऱ्यांची एफआरपी थकवली आणि दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्याचे ढोंग करत आहेत. विनय कोरे जिल्ह्याचे नेते म्हणतात आणि आतापर्यंत केवळ ४७ टक्के एफआरपी दिल्याची टीका चुडमुंगे यांनी केली.

शेट्टींच्या नाद सोडलाहसन मुश्रीफ यांनी जिल्हा बॅँकेत बसून एफआरपीचा कायदा मोडला तरी शेतकऱ्यांचे नेते म्हणणारे गप्प बसल्याचे सांगत गेले वर्षीपासून राजू शेट्टींचे नाव घ्यायचे नाही आणि त्यांच्या रस्त्याला जाणार नसल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी