शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

कोल्हापूर : शिये खणीमध्ये मायलेकाचा मृत्यू, धुणे धुताना घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 17:36 IST

शिये (ता. करवीर) येथील क्रशर खणीमध्ये कपडे धुण्यास गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सविता आप्पासाहेब निलगिरे (वय २४, रा. शिये क्रशर खणीजवळ), त्यांचा मुलगा सोनू (४) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पाण्यात बुडणाऱ्या पोटच्या मुलाला वाचविताना ही  घटना घडली.

ठळक मुद्देशिये खणीमध्ये मायलेकाचा मृत्यूधुणे धुताना घटनावटवाघळांवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना

कोल्हापूर : शिये (ता. करवीर) येथील क्रशर खणीमध्ये कपडे धुण्यास गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सविता आप्पासाहेब निलगिरे (वय २४, रा. शिये क्रशर खणीजवळ), त्यांचा मुलगा सोनू (४) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पाण्यात बुडणाऱ्या पोटच्या मुलाला वाचविताना ही  घटना घडली.अधिक माहिती अशी, सविता निलगिरे यांचे मूळ गाव करजगा, ता. हुक्केरी, जि. बेळगाव आहे. त्या कुटुंबासह या ठिकाणी राहत होत्या. त्यांचा दीर बापू मारुती निलगिरे हा विठ्ठल पाटील यांच्या शिये येथील क्रशरवर मजुरीची कामे करतो. त्याचे दि. १८ जून रोजी लग्न आहे. गांधीनगर येथे लग्नाचा जथ्था काढण्यासाठी दोन दिवसांपूर्वी सविता पती व मुलासोबत शिये येथील दिराच्या घरी आल्या होत्या.

सोमवारी सर्वजण जथ्था काढण्यासाठी जाणार होते. शनिवारी सकाळी त्या मुलगा सोनू याला घेऊन कपडे धुण्यासाठी शेजारीच असलेल्या खणीमध्ये गेल्या. खणीवर अन्य महिलाही धुण्यासाठी आल्या होत्या. सविता धुणे धूत असताना मुलगा सोनू खणीजवळ खेळत होता. तो पाण्यात उतरून आतमध्ये गेला. अचानक खोल पात्रात पडल्याने तो बुडू लागला.

यावेळी खणीवरील महिलांनी आरडाओरड केली. पोटचा गोळा बुडत असल्याचे पाहून सविता त्याला बाहेर काढण्यासाठी पाण्यात गेल्या. त्यांना पोहता येत नसल्याने मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याही बुडाल्या.

खणीवरील आरडाओरडा ऐकून क्रशरवर काम करणारा मजूर बाळकृष्ण आप्पासाहेब सनदी धावत आला. त्याने पाण्यात उडी घेत सोनूला बाहेर काढले. त्याचा श्वास सुरू असल्याचे लक्षात येताच खासगी वाहनातून त्याला तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

त्यानंतर खणीत बुडालेल्या सविता यांचा मृतदेह बाहेर काढून ‘सीपीआर’च्या शवगृहात आणला. या ठिकाणी पतीसह नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद शिरोली एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्यात झाली आहे.डॉक्टरांनाही गहिवरून आले‘सीपीआर’च्या अपघात विभागात चार वर्षांच्या सोनूला आणले. बेडवर निपचित पडलेल्या सोनूला पाहून डॉक्टर, परिचारिकांसह अन्य रुग्णांच्या नातेवाइकांनाही गहिवरून आले.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर