शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सीआर पोर्टल हातात...१८ लाखांचे १५० मोबाइल शोधले महिन्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:16 IST

सायबर पोलिसांकडून परत देण्याची प्रक्रिया सुरू

कोल्हापूर : गहाळ झालेल्या आणि चोरीला गेलेल्या मोबाइलचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीआर (CEIR) पोर्टलचा वापर सुरू केला आहे. या पोर्टलच्या मदतीने गेल्या एका महिन्यात १८ लाख रुपये किमतीचे १५० मोबाइल शोधण्यात पोलिसांना यश आले.संबंधित मोबाइल मूळ मालकांना परत देण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली. तसेच चोरीला गेलेल्या बहुतांश मोबाइलची विक्री आसपासच्या जिल्ह्यांत झाल्याचे तपासातून स्पष्ट झाले.मोबाइल चोरीचे वाढते गुन्हे रोखण्यासह चोरीला गेलेल्या मोबाइलचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी सायबर पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार सायबर पोलिसांनी सीआर पोर्टलच्या मदतीने मोबाइलचा शोध सुरू केला. गेल्या महिनाभरात चोरीतील १५० मोबाइल पुन्हा सुरू झाल्याची माहिती पोर्टलद्वारे मिळाली.त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी १५० मोबाइल जप्त केले. संबंधित मोबाइल मूळ मालकांना परत देण्याची मोहीम गुरुवारपासून सुरू झाली. अधीक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते १० जणांना त्यांचे मोबाइल परत देण्यात आले. उर्वरित १४० जणांना शुक्रवारपासून मोबाइल परत दिले जाणार आहेत, अशी माहिती सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश होडगर यांनी दिली.निरीक्षक होडगर यांच्यासह उपनिरीक्षक अतिष म्हेत्रे, सहायक फौजदार राजेंद्र ताटे, मीनाक्षी पाटील, रवींद्र पाटील, सागर माळवे, अमर वासुदेव, अमर आडसुळे, संगीता खोत, आदींच्या पथकाने मोबाइलचा शोध घेतला.

असे शोधले मोबाइलचोरीला गेलेल्या मोबाइलचा आयएमईआय नंबर, आधार नंबर टाकताच सीआर पोर्टल २४ तास या नंबरचा शोध घेत राहते. मोबाइल सुरू होताच सायबर पोलिसांना मेसेजद्वारे त्यातील सीमकार्डचा नंबर मिळतो. त्यावरून पोलिसांना लोकेशन काढून संबंधितांपर्यंत पोहोचता येते. यापूर्वी दर तीन महिन्यांनी सीमकार्ड कंपन्यांना चोरीला गेलेल्या मोबाइलची माहिती पाठवून त्याचा पाठपुरावा करावा लागत होता. सीआर पोर्टलद्वारे तपासाचे काम गतिमान झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

संचारसाथी पोर्टलचा वापर कराकेंद्र सरकारने संचारसाथी पोर्टलची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध केली आहे. यात चोरीला गेलेल्या किंवा गहाळ झालेल्या मोबाइलचा आयएमईआय नंबर टाकताच याची तक्रार इंडियन सायबर कोऑर्डिनेशन सेंटरकडे नोंदवली जाते. यातून मोबाइलचा शोध घेण्यास मदत होते. तसेच आपल्या नावावर खरेदी झालेले सीमकार्ड आणि ऑनलाइन फसवणुकीबद्दल तक्रार देता येते. नागरिकांनी या पोर्टलचा वापर करावा, असे आवाहन अधीक्षक योगेश कुमार यांनी केले आहे.