शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कोल्हापूर : शासकीय नोकरीचे आमिष दाखवून चौदा लाखांचा गंडा, चौघा भामट्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 3:24 PM

राष्ट्रीय कृत बँका, रेल्वे आणि सैन दलामध्ये नोकरीचे आमिष दाखवून चौघा भामट्यांनी तरुणाला १४ लाख २० हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी राजारामपूरी पोलीसांनी रविवारी (दि. २१) मूख्य सूूत्रधार संशयित बाजीराव उर्फ सागर मोहिते (रा. कनाननगर), सागर ब्रम्हदेव भोसले (रा. बारामती पुणे), सुदेश मधुकर आव्हाड, आशिष सुरेश आव्हाड (दोघे रा. कोंडवा, पुणे) यांचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला

ठळक मुद्देशासकीय नोकरीचे आमिष दाखवून चौदा लाखांचा गंडाचौघा भामट्यांवर गुन्हा

कोल्हापूर : राष्ट्रीय कृत बँका, रेल्वे आणि सैन दलामध्ये नोकरीचे आमिष दाखवून चौघा भामट्यांनी तरुणाला १४ लाख २० हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी राजारामपूरी पोलीसांनी रविवारी (दि. २१) मूख्य सूूत्रधार संशयित बाजीराव उर्फ सागर मोहिते (रा. कनाननगर), सागर ब्रम्हदेव भोसले (रा. बारामती, पुणे), सुदेश मधुकर आव्हाड, आशिष सुरेश आव्हाड (दोघे रा. कोंडवा, पुणे) यांचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.अधिक माहिती अशी, सय्यद शफिकउल्लाह पटेल (वय ३५, रा. तोरणानगर, सागरमाळ रेड्याची टेकडी परिसर, कोल्हापूर) हे खासगी नोकरी करतात. त्यांच्या शेजारी राहणारे मुकूंद कदम हे जमिन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी माझा मित्र बाजीराव मोहिते याचा शासकीय नोकरी लावण्यामध्ये हातखंडा आहे. त्याने शिरोली दूमाला (ता. करवीर) आणि कबनुर (ता. हातकणंगले) येथील दोन तरुणांना रेल्वेत नोकरी लावली आहे. तुझे कोणी नातेवाईकांना नोकरी लावायची असेल तर सांग म्हणून सांगितले होते.

पटेल यांचा भाचा रोशनजमीर मोहमद आस्लम चक्कोली याचे बारावीपर्यंत, त्याचा मित्र लक्ष्मण गोपाला लक्षाणी याचे पदवीपर्यंत शिक्षण झाले होते. दोघेही नोकरीच्या शोधात होते. त्यामूळे पटेल यांनी या दोघांना नोकरी लावण्यासाठी बाजीरावची भेट घेतली. त्याने भारतीय स्टेट बॅक, दक्षिण मध्य रेल्वे व भारतीय सैन्य दलात नोकरीची संधी आहे.

साथीदार मित्र सागर भोसले, सुदेश आणि आशिष आव्हाड यांचेशी बोलणे करुन नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पटेल यांचेकडून वेळोवेळी दिल्ली, बंगलुर, पुणे, निपाणी येथे १४ लाख २० हजार रुपये घेतले. त्यानंतर या चौघांनी संगनमत करुन रोशनजमीर चक्कोली आणि लक्ष्मण लक्षाणी या दोघांच्या नावे खोट्या नोकरीच्या आॅर्डरी पटेल यांना दिल्या. त्यांनी संबधीत रेल्वे आणि सैन्य दलात चौकशी केली असता अशी कोणतीही भरती झाली नसलेचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झालेचे लक्षात येताच त्यांनी संशयितांच्या विरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक औदूंबर पाटील करीत आहेत.गावात डिजीटल फलकसंशयित भामट्यांनी शिरोली दूमाला येथील युवकाला हाताशी धरुन त्याला रेल्वेमध्ये नोकरी लागलेचे दाखिवले. त्याला कलकत्त्यालाही रवाना केले. त्या युवकाने गावात आपल्या मित्र परिवाराला नोकरी लागल्याचे सांगितल्याने त्याच्या शुभेच्छांची डिजीटल फलक गावात लागली. हा माहोल संशयित इतर लोकांना गावात पाठवून चौकशी करण्यास सांगत असत. लोक त्या युवकाच्या घरापर्यंत चौकशी करीत. पटेल यांनीही चौकशी केली असता मुलगा नोकरीला लागला असून तो कलकत्ता येथे गेला आहे, असे त्याचे आई-वडीलांनी सांगितले. त्यामुळे पटेल यांचा भामट्यांवर विश्वास बसला.संशयित सराईतफसवणूकीत मूख्य सूत्रधार बाजीराव मोहिते याचेवर हाणामारीचे गुन्हे, सागर भोसले, सुदेश आव्हाड, आशिष आव्हाड यांचेवर जुनाराजवाडा, लक्ष्मीपूरी, करवीर आणि हडपसर पुणे येथे फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. चौघेही सराईत गुन्हेगार आहेत. यापूर्वी त्यांना विविध गुन्ह्यात अटकही झाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीkolhapurकोल्हापूर