शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: पोलीस ठाण्याच्या आवारातच लाच स्वीकारताना कॉन्स्‍टेबल अटकेत

By तानाजी पोवार | Updated: September 2, 2022 15:47 IST

अटक वॉरंट निघालेल्या मॅकेनिकलला अटक न करता गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली लाच

कोल्हापूर : अटक वॉरंट निघालेल्या मॅकेनिकलला अटक न करता गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या हातकणंगले पोलीस ठाण्यातील कॉन्स्‍टेबलला लाचलुचपत प्रतिबंध पथकाने रंगेहात पकडले. नामदेव औदुंबर कचरे (वय 36, रा. हातकणंगले) असे या अटक केलेल्या कॉन्स्‍टेबलचे नाव आहे. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या आवारात ऐन गणेशोत्सवातील झालेल्या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली. आज, शुक्रवार दुपारी ही कारवाई करण्यात आली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हातकणंगले येथील एका व्यवसायाने मेकॅनिकल विरोधात धारवाड (राज्य कर्नाटक) न्यायालयात खटला दाखल आहे. न्यायालयीन कामकाजासाठी संबंधित मॅकेनिकल, तक्रारदार अनुपस्थित राहत होते. अखेर धारवाड न्यायालयाने त्याला अटक वॉरंट बजावले होते. संबंधित आदेशाची प्रत घेऊन हातकणंगले पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी मॅकेनिकल तक्रारदाराच्या घरी गेले. मात्र पोलीस नाईक नामदेव कचरे यांनी संबंधित अटक वॉरंट प्रकरणात मदत मदत करू असे सांगून त्याच्याकडून दोन हजार रुपये लाचेची मागणी केली.संबंधित तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे लेखी तक्रार केली. आज, शुक्रवारी सकाळी सापळा रचला असता तक्रारदार व्यक्तीकडून दोन हजार रुपये घेताना पथकाने कचरे याला रंगेहात पकडले. हातकणंगले पोलीस स्टेशन परिसरातच ही घटना घडली. याप्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कचरे याला ताब्यात घेतले आहे.पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोसई संजीव बंबर्गेकर, हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, विकास माने, पोलीस नाईक सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, मयूर देसाई, विष्णू गुरव यांनीही कारवाई केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिस