शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कोल्हापूर : साखर उद्योगाला जाहीर केलेल्या दराची चिंता, गाळप वाढणार : तीस टक्के हंगाम आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 10:57 IST

एका बाजूला उसाचे गाळप वाढणार आहे व त्याचवेळेला बाजारातील साखरेचे दर घसरत असल्याने एफआरपीपेक्षा जादा रक्कम ज्या कारखान्यांनी जाहीर केली आहे, त्यातील अनेक कारखान्यांना ही रक्कम देताना चांगलाच घाम फुटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा बफर साठा करून बाजारातील साखरेचे दर नियंत्रित करण्याची मागणी पुढे आली आहे.

ठळक मुद्दे अनेक कारखान्यांना एफआरपीपेक्षा जादा रक्कम देताना घाम फुटण्याची चिन्हे साखरेचा बफर साठा करून बाजारातील साखरेचे दर नियंत्रित करण्याची मागणी ६८० लाख टन गाळप, ७५ लाखांहून जास्त टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज

विश्वास पाटील 

कोल्हापूर : एका बाजूला उसाचे गाळप वाढणार आहे व त्याचवेळेला बाजारातील साखरेचे दर घसरत असल्याने एफआरपीपेक्षा जादा रक्कम ज्या कारखान्यांनी जाहीर केली आहे, त्यातील अनेक कारखान्यांना ही रक्कम देताना चांगलाच घाम फुटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा बफर साठा करून बाजारातील साखरेचे दर नियंत्रित करण्याची मागणी पुढे आली आहे.राज्यातील यंदाचा हंगाम तीस टक्के संपला आहे. यंदा सरकारने ६३० लाख गाळप टनाचा अंदाज केला होता; परंतु नोव्हेंबरपर्यंत लांबलेला परतीच्या पावसामुळे यंदा किमान ५० लाख टन गाळप वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुख्यत: सोलापूर जिल्ह्यात व मराठवाड्यात हे गाळप वाढणार आहे. नव्या अंदाजानुसार ६८० लाख टन गाळप व ७५ लाखांहून जास्त टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.भविष्यात साखरेचे दर चांगले राहतील असे गृहीत धरून कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले आहे; परंतु साखरेचे दर ३ हजारांवर आल्यावर तेवढीच पहिली उचल देताना कारखान्यांची दमछाकच होणार आहे. इतर बिले थांबवून कारखाने तूर्त काहीतरी व्यवस्था करू शकतील परंतु दर घसरला तर राज्य बँकेकडून मिळणारी उचल कमी होणार असून कारखान्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

 

बाजारातील साखरेचे दर वाढू नयेत याची काळजी घेण्याऱ्या केंद्र सरकारने कारखान्यांना किमान ३५०० रुपये क्विंटल दर मिळायला हवा याची दक्षता घेतली पाहिजे. यासाठी निर्यातीस प्रोत्साहन किंवा बफर साठा करून बाजारातील दर घसरू नयेत यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.विजय औताडेसाखर उद्योगातील तज्ज्ञ

 

हंगामाचे असेही वैशिष्ट्ययंदाच्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २९ कारखाने वाढले आहेत. त्यामध्ये सहकारी १० व खासगी १९ वाढले. प्रतिदिन गाळपही १ लाख ५४ हजार टनांनी वाढले. अनेक कारखान्यांनी विस्तारीकरण केल्याचा हा परिणाम आहे. आतापर्यंत १ कोटी टनांचे गाळप जास्त झाले आहे. परतीच्या पावसामुळे टनेज वाढले परंतु उतारा मात्र पाँईट २ ने घसरला आहे.राज्यातील १८ डिसेंबरअखेरचे गाळपविभाग       हंगाम सुरू झालेले कारखाने      गाळप (लाख टन)      साखर उत्पादन (लाख टन)    उतारा टक्के(कंसातील आकडे खासगी कारखान्यांचे)

  1. कोल्हापूर            २६ (११)                                  ६७.२२                                ७.४६                              ११.११
  2. पुणे                     ३०(३०)                                  ११२.४०                              ११.२६                            १०.०३
  3. अहमदनगर        १५ (०९)                                 ३९.९५                                 ०३.७२                            ०९.३३
  4. औरंगाबाद           ११(०९)                                 २३.९१                                  ०१.९४                           ०८.१३
  5. नांदेड                  १४(१५)                                  ३५.३९                                  ०३.६८                           ०९.२४
  6. अमरावती           ०० (०२)                                 ०२.१७                                  ००.०२                           ०९.५०
  7. नागपूर               ०० (०४)                                 ०१.७१                                  ००.०१                           ०८.४२

एकूण                    १४७ (६१)                             २८२.७६                              २८.२९                         ०९.९१ 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर