कोल्हापूर : अनंत चतुर्दशीपूर्वी पॅचवर्कची कामे पूर्ण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 15:47 IST2018-09-15T15:46:34+5:302018-09-15T15:47:30+5:30
कोल्हापूर शहरातील खराब रस्ते आणि करावयाची पॅचवर्कची कामे यावर स्थायी समिती सभेत जोरदार चर्चा झाली. रस्त्यांवरील पॅचवर्क करण्याची कामे कधी पूर्ण करणार, असा संतप्त सवाल सदस्यांनी प्रशासनास विचारला; तर अनंत चतुर्दशीपूर्वी पॅचवर्कची कामे पूर्ण करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोल्हापूर : अनंत चतुर्दशीपूर्वी पॅचवर्कची कामे पूर्ण करणार
कोल्हापूर : शहरातील खराब रस्ते आणि करावयाची पॅचवर्कची कामे यावर स्थायी समिती सभेत जोरदार चर्चा झाली. रस्त्यांवरील पॅचवर्क करण्याची कामे कधी पूर्ण करणार, असा संतप्त सवाल सदस्यांनी प्रशासनास विचारला; तर अनंत चतुर्दशीपूर्वी पॅचवर्कची कामे पूर्ण करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राहुल माने यांनी हा प्रश्न उपस्थित केला. डांबरी प्लॅँट अद्याप सुरू झालेला नाही. पॅचवर्कची कामे कधी पूर्ण करणार, अशी विचारणा माने यांनी केली. त्यावेळी पॅचवर्कची कामे सुरू आहेत. मिरवणूक मार्गावरील कामे प्राधान्याने केली जातील. तसेच ही कामे विसर्जन मिरवणुकीपूर्वी केली जातील, असे सांगण्यात आले.
राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी शहरातील अनेक मिळकतधारकांना अर्ज करायचे असल्याने त्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी सूचना संजय मोहिते यांनी सभेत केली. तेव्हा ५ सप्टेंबरला मुदत संपली असून, यापूर्वी एकदा मुदतवाढ देण्यात आली होती. आता जर मुदतवाढ द्यायची असेल तर आयुक्तांची परवानगी आवश्यक असल्याचे अधिकार्यानी स्पष्ट केले.
तक्रारी करण्यात आलेल्या ठिकाणची पाण्याच्या गळती अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत, याकडे गीता गुरव यांनी अधिकार्याचे लक्ष वेधले. कचरा उठाव करण्यासाठी घेण्यात येत असलेली वाहनांची क्षमता आणि किंमत या दोन्ही गोष्टींचा विचार करावा, अशी सूचना राहुल माने यांनी केली.
आरोग्य कर्मचारी गणवेश व गमबूट वापरत नाहीत. त्यांना गणवेश वापरायला सांगा, अशी सूचना प्रतिज्ञा निल्ले यांनी केली. त्यावर कर्मचारी संघटना न्यायालयात गेली असल्याने त्यांना गणवेश देता आलेले नाहीत, असा खुलासा करण्यात आला.
राजारामपुरी परिसरात सफाई कर्मचार्याची संख्या कमी आहे. गणेशोत्सव काळात या ठिकाणी भरपूर गर्दी होते. गर्दीच्या ठिकाणी रोज स्वच्छता करणे गरजेचे असल्याचे निल्ले व संजय मोहिते यांनी सांगितले. भटक्या कुत्र्यांसह जनावरांच्या विषयावरही सभेत चर्चा झाली. रोज १० भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याचे तसेच भटक्या जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्यात येत असल्याचे सभेत सांगण्यात आले.