कोल्हापूर : महिला कॉंग्रेसच्या वतीने कदम यांच्या प्रतिमेचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 16:37 IST2018-09-06T16:30:31+5:302018-09-06T16:37:55+5:30
महिलांविषयी अनुद्गार काढणारे भाजपचे आमदार राम कदम यांच्या प्रतिमेचे महिला कॉँग्रेसच्या वतीने दहन करण्यात आले.

कोल्हापूर : महिला कॉंग्रेसच्या वतीने कदम यांच्या प्रतिमेचे दहन
कोल्हापूर : महिलांविषयी अनुद्गार काढणारे भाजपचे आमदार राम कदम यांच्या प्रतिमेचे महिला कॉँग्रेसच्या वतीने दहन करण्यात आले.
जिल्हा कॉँग्रेसच्या उपाध्यक्षा दीपा पाटील आणि शहराध्यक्षा संध्या घोटणे यांच्या नेतृत्वाखाली दाभोळकर कॉर्नर येथे या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कदम यांच्या प्रतिमेला चपला मारून ती जाळण्यात आली. यावेळी जोरात घोषणाबाजीही करण्यात आली.
या आंदोलनामध्ये चंदा बेलेकर, वैशाली महाडिक, मंगल खुडे, लीला धुमाळ, विद्या घोरपडे, किशोर खानविलकर, संपतराव चव्हाण-पाटील, महंमद शेख यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र या आंदोलनाचा निरोप वेळेत न मिळाल्याने काही महिलांनी यावेळी वाद घातला.
दुपारी दोन वाजता हे आंदोलन करण्याच्या सूचना महिला पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. काही महिला पदाधिकारी उशिरा आल्या. तोपर्यंत उपस्थित महिलांनी आंदोलन केले. यावरून महिलांमध्येच जोरदार चकमक झडली.