शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

Raksha Bandhan : सैनिकांसाठी दोन लाख राख्यांचे संकलन, कोल्हापुरातील विवेकानंद ट्रस्टचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:00 IST

माझा भाऊ सीमेवर लढताना शहीद झाला, याचे जरी व्यक्तिगत दु:ख असले, तरी आम्हा सर्व कुटुंबीयांना त्याचा सार्थ अभिमान आहे. प्रत्येक घरात ‘कौस्तुभ’ जन्माला आला पाहिजे, असे प्रतिपादन शहीद मेजर कौस्तुभ राणें यांची बहिण अश्विनी तावडे यांनी केले.

ठळक मुद्देसैनिकांसाठी दोन लाख राख्यांचे संकलन, विवेकानंद ट्रस्टचा उपक्रम प्रत्येक घरात ‘कौस्तुभ’ जन्मावा : तावडे

कोल्हापूर : माझा भाऊ सीमेवर लढताना शहीद झाला, याचे जरी व्यक्तिगत दु:ख असले, तरी आम्हा सर्व कुटुंबीयांना त्याचा सार्थ अभिमान आहे. एकीकडे तरुण सैनिक सीमेवर शहीद होत आहेत, तर दुसरीकडे व्यसनाच्या नशेत अनेक तरुण जीवन संपवत आहेत. समाजातील ही स्थिती बदलली पाहिजे. प्रत्येक घरात ‘कौस्तुभ’ जन्माला आला पाहिजे, असे प्रतिपादन शहीद मेजर कौस्तुभ राणें यांची बहिण अश्विनी तावडे यांनी केले.

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सीमेवरील जवानांसाठी रक्षाबंधनासाठी संकलित केलेल्या राखी पाठविण्याच्या उपक्रमात महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते जवानांना राख्या बांधण्यात आल्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)

शाहू स्मारक भवनात स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सीमेवरील जवानांकरिता रक्षाबंधनासाठी संकलन केलेल्या राखी पाठविण्याच्या उपक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या. शहीद कुंडलिक माने यांच्या आई ज्ञानूबाई माने, वडील केरबा माने, निवृत्त सुभेदार एन. एन. पाटील उपस्थित होते.

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सीमेवरील जवानांसाठी रक्षाबंधनासाठी संकलित केलेल्या राखी पाठविण्याच्या उपक्रमात शालेय विद्यार्थिनींनी जवानांना राख्या बांधल्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)

महापौर बोंद्रे म्हणाल्या, ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम कौतुकास्पद आहे. छत्रपती ताराराणी मुलींसाठी, सैनिक स्कूलसाठी कटिबद्ध राहू. ज्ञानूबाई माने म्हणाल्या, ‘मुलाच्या जाण्याचे दु:ख आहे; पण एक मुलगा शहीद झाला म्हणून काय झाले? देशरक्षणासाठी गरज पडल्यास माझ्या नातवंडांनाही सीमेवर पाठवायला मी कमी करणार नाही.’कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘बॉर्डर’ विषयावर नाटिका सादर केली. शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, ‘मर्द मराठे खरे’ हे गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते मराठा बटालियनचे लेफ्टनंट तानाजी चौगुले यांच्याकडे संकलित केलेल्या सुमारे दोन लाख राख्या सुपूर्द करण्यात आल्या. ‘शिवगंधार’ प्रस्तुत ‘वंदे मातरम्’ या देशभक्तिपर गीतांवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आला.

देशभक्तिपर गाण्यांनी कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढविला. महिलांनी मराठा बटालियनच्या जवानांना औक्षण करीत राखी बांधली; त्यामुळे वातावरण भावपूर्ण बनले. संयोजक किशोर घाटगे यांनी प्रास्ताविक केले.

सुखदेव गिरी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, डॉ. सायली कचरे, अंकुश टोपले, माधुरी नकाते, विशाल देवकुळे, सीमा मकोटे, धनंजय नामजोशी, रघुनाथ टिपुगडे, कमलाकर किलकिले, यशश्री घाटगे, आनंद गुरव, युवराज जाधव, सुनील सामंत उपस्थित होते. 

 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनkolhapurकोल्हापूर