शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात मतदानाला सुरुवात, मतदारांची केंद्रांवर गर्दी
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

कोल्हापूर : सर्किट बेंचप्रश्नी सहा जिल्ह्यांतील वकिलांची शुक्रवारी बैठक : प्रशांत शिंदे, आंदोलनाची दिशा, अवमान याचिकाबाबत चर्चा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 5:49 PM

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील बांधवांची शुक्रवारी (दि. २२) मार्केट यार्डातील कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये दुपारी चार वाजता बैठक होणार आहे.

ठळक मुद्देप्रशांत शिंदे : आंदोलनाची दिशा, अवमान याचिकाबाबत चर्चा होणारसहा जिल्ह्यांना भेटी देऊन सर्वानुमते शुक्रवारच्या बैठकीचा निर्णय

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील बांधवांची शुक्रवारी (दि. २२) मार्केट यार्डातील कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये दुपारी चार वाजता बैठक होणार आहे.या बैठकीत सर्किट बेंचप्रश्नी पुढील आंदोलनाची दिशा व अवमान याचिकेबाबतचर्चा होणार असल्याची माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत शिंदे यांनी मंगळवारी दिली.प्रशांत शिंदे म्हणाले, उच्च न्यायालयाचे प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ व्हावे, अशी मागणी गेल्या दोन दशकांपासून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील वकील बांधवांची आहे. याप्रश्नी निदर्शने, एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण, धरणे आंदोलन अशी वेगवेगळी आंदोलने वकिलांनी केली आहेत. या सहा जिल्ह्यांत सुमारे १६ हजार वकील बांधव आहेत.सर्किट बेंचप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक व्हावी यासाठी विद्यमान पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांना तुम्ही, मुख्यमंत्र्यांना बैठकीबाबत सांगा, अशी विनंती केली आहे. त्याचबरोबर सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनला भेटी देऊन तेथील अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह पदाधिकाऱ्यांची चर्चा व या बैठकीची पत्रे दिली आहेत.

वकिलांनीही या बैठकीला येणार असल्याचे आम्हाला सांगितले आहे. अवमान याचिका व कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी आंदोलनाबाबत वकिलांशी मते आजमावून घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा या बैठकीत ठरविण्यात येणार आहे.याबाबत सेक्रेटरी अ‍ॅड. किरण पाटील म्हणाले, नवीन कार्यकारिणी झाल्यानंतर प्रा. एन. डी. पाटील व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील या दोघांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानंतर सहा जिल्ह्यांना भेटी देऊन सर्वानुमते शुक्रवारच्या बैठकीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHigh Courtउच्च न्यायालय