शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटन सोहळा सर्वांसाठी खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:15 IST

प्रोटोकॉल समितीकडून पाहणी, अधिकाऱ्यांसोबत बैठक, सुरक्षेबद्दल सूचना

कोल्हापूर : सर्किट बेंचच्या उद्घाटन समारंभात सर्वांना सहभागी होता यावे, यासाठीच मेरी वेदर ग्राउंडवर याचे आयोजन केले आहे. हा समारंभ सर्वांसाठी खुला आहे. मात्र, उपस्थितांना शिष्टाचार पाळावा लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. सर्वोच्च न्यायलय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रोटोकॉल समितीने बुधवारी (दि. १३) सर्किट बेंच इमारत आणि समारंभ स्थळाची पाहणी करून सुरक्षेबद्दल अधिका-यांना सूचना दिल्या.तब्बल ४२ वर्ष संघर्ष केल्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंचला मंजुरी मिळाली. याच्या उद्घाटनाचा क्षण सर्वांना अनुभवता आला पाहिजे, यासाठी सार्वजनिक ठिकाणी समारंभाचे आयोजन करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मेरी वेदर ग्राउंडवर समारंभाचे आयोजन केले आहे.सुरक्षेच्या दृष्टीने कोणाला आणि किती लोकांना प्रवेश द्यावा, याबाबत संभ्रमावस्था होती. मात्र, हा समारंभ सर्वांसाठी खुला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, उपस्थितांना शिष्टाचार पाळावे लागतील. समारंभ सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधीच आपल्या जागेवर पोहोचावे लागेल. कोणत्याही घोषणा देणे किंवा अनुचित प्रकार करता येणार नाही. पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे लागेल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.समारंभाला अवघे तीन दिवस उरल्याने कामांचा आढावा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाची प्रोटोकॉल समिती बुधवारी कोल्हापुरात दाखल झाली. पाच सदस्यीय समितीने सर्किट बेंच इमारतीच्या कामांची पाहणी केली. मेरी वेदर ग्राउंडवरील मंडपाच्या कामांची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी सुरक्षेबद्दल विविध सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांच्यासह पोलिस अधीक्षक योगेश कुमार उपस्थित होते.या सूचना केल्याप्रोटोकॉल समितीने सुरक्षा, वाहतूक, पार्किंग, व्यासपीठावरील व्यक्तींच्या संख्येबाबत अधिका-यांना सूचना केल्या. उद्घाटन आणि कार्यक्रमस्थळी पुरेसा बंदोबस्त तैनात असावा. न्यायमूर्तींच्या जवळ जाणाऱ्या व्यक्तींची तपासणी व्हावी. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वाहने पार्क करण्यासाठी पुरेशी जागा असावी. वैद्यकीय पथक सज्ज असावे. समारंभस्थळी अग्निशामक यंत्रणा उपलब्ध असावी, अशा विविध सूचना त्यांनी केल्या आहेत. त्यानुसार काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.काहींना पासचे वाटपन्यायमूर्तीसह अन्य मान्यवरांच्या जवळ जाणाऱ्या व्यक्ती, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासाठी पास घेणे बंधनकारक केले आहे. सहा जिल्ह्यांतून निमंत्रित केलेले लोकप्रतिनिधी, आजी-माजी न्यायाधीश, ज्येष्ठ वकील, विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवरांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली जाईल. वकिलांसाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांना जिल्हा बार असोसिएशनने एक लिंक पाठवली असून, त्यावर क्लिक करून नोंदणी करावी लागेल, अशी माहिती जिल्हा बार असोसिएशनने दिली.