कोल्हापूर : दसरा शमीपूजन कार्यक्रमानिमित्त वाहतूक मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 17:45 IST2018-10-17T17:39:54+5:302018-10-17T17:45:42+5:30

विजयादशमी, दसऱ्यानिमित्त शमीपूजन व सीमोल्लंघन कार्यक्रम गुरुवारी दसरा चौकात होत आहे. या कार्यक्रमास भाविकांची गर्दी होत असते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी या मार्गावरील वाहतुकीच्या मार्गांत बदल करण्यात आले आहेत. त्याची पाहणी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी दुपारी केली. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Kolhapur: Changes in the traffic convergence on the occasion of Dasara Shamipujan | कोल्हापूर : दसरा शमीपूजन कार्यक्रमानिमित्त वाहतूक मार्गात बदल

कोल्हापूर : दसरा शमीपूजन कार्यक्रमानिमित्त वाहतूक मार्गात बदल

ठळक मुद्देदसरा शमीपूजन कार्यक्रमानिमित्त वाहतूक मार्गात बदल सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात

कोल्हापूर : विजयादशमी, दसऱ्यानिमित्त शमीपूजन व सीमोल्लंघन कार्यक्रम गुरुवारी दसरा चौकात होत आहे. या कार्यक्रमास भाविकांची गर्दी होत असते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी या मार्गावरील वाहतुकीच्या मार्गांत बदल करण्यात आले आहेत. त्याची पाहणी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी दुपारी केली. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

दुचाकी वाहतुकीस बंद मार्ग

दसरा चौक येथे येणारे सीपीआर चौक, प्रिन्स शिवाजी पुतळा, स्वयंभू गणेश मंदिर चौक या दिशेकडून येणाºया सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

अवजड वाहतूक वळविण्यात आलेला मार्ग

भाऊसिंगजी रोडने शिवाजी पुलाकडून येणारी सर्व अवजड वाहनांची वाहतूक ही सीपीआर चौक, प्रिन्स शिवाजी पुतळा, शाहू ब्लड बँकमार्गे पुढे सोईनुसार मार्गस्थ होतील. बिंदू चौक, फोर्ड कॉर्नरमार्गे येणारी सर्व वाहने स्वयंभू गणेश मंदिर, कोंडा ओळ सिग्नल, व्हीनस कॉर्नरमार्गे जातील. स्टेशन रोडकडून व्हीनस कॉर्नर चौकाकडे येणारी सर्व वाहने लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नरमार्गे पुढे जातील.
 

 

Web Title: Kolhapur: Changes in the traffic convergence on the occasion of Dasara Shamipujan