कोल्हापूर : ई-फार्मसीजच्या निषेर्धात कोल्हापूरातील औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 17:09 IST2018-09-28T17:07:11+5:302018-09-28T17:09:37+5:30
केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री व ई-फॉर्मासी धोरणाच्या विरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी शुक्रवारी बंद पुकारला होता.या बंदमध्ये कोल्हापूरातील सर्वच औषध विक्रेत्यांनी सहभागी होत संपूर्ण दिवसभर कडकडीत बंद पाळला.

कोल्हापूर : ई-फार्मसीजच्या निषेर्धात कोल्हापूरातील औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद
कोल्हापूर : केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री व ई-फॉर्मासी धोरणाच्या विरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी शुक्रवारी बंद पुकारला होता.या बंदमध्ये कोल्हापूरातील सर्वच औषध विक्रेत्यांनी सहभागी होत संपूर्ण दिवसभर कडकडीत बंद पाळला.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे औषधांची आॅनलाईन विक्री केल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होवू शकतो. याबाबत जागरुकता आणण्यासाठी आॅल इंडिया आॅगनायझेशन आॅफ केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट(एआयओसीडी) या देशाच्या केमिस्टस् व वितरकांच्या शिखर संस्थेने भूमिका स्पष्ट केली होती. त्यानूसार शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या स्टेशनरोडवरील जिल्हा कार्यालयात एकत्र आले.
यावेळी स्टेशनरोड- असेंम्बली रोड - जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. तत्पुर्वी हा मोर्चाद्वारे उमा टॉकीज परिसरातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सह संचालकांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले. यात जिल्ह्यातील आठशेहून अधिक विक्रेते सहभागी झाले होते. या धोरणाचा निषेध म्हणून काही विक्रेते काळे कपडे घालून सहभागी झाले होते. विशेष म्हणून मुकमोर्चा काढण्यात आला. औषध विक्रेत्यांच्या हाती दुष्परिणाम व निषेधाचे फलक होते.
जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पोहचल्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी केले. यावेळी पदाधिकारी उपमहापौर महेश सावंत, शिवाजी ढेगे, राजकुमार छाबडा, प्रल्हाद खवरे, राहूल कारेकर, बलराम छाबडा, सचिन पुरोहीत, संजय शेटे, भरतेश कळंत्रे, निवास साळोखे, रवि जोशी, भुजंग भांडवले, आदी उपस्थित होते.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचल्यानंतर सहभागी झालेल्या आंदोलक औषध विक्रेत्यांना सेल्फीचा मोह काही केल्या आवरता आला नाही. अनेकांनी परिसरात उभे राहून मोबाईलद्वारे आपल्या छबी घेण्याची एकच घाई झाली होती. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या आंदोलकांना परिसरात बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी बाहेर जाण्याची विनंती करीत होते.
केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री व ई-फॉर्मासी धोरणाच्या विरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी शुक्रवारी बंद पुकारला होता. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर औषध विक्रेत्यांनी आंदोलन केले.
(छाया : नसीर अत्तार )