शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूर : चालकाच्या चुकीमुळे बस दुर्घटना :चंद्रकांतदादा पाटील, शिवाजी पुलावरील वाहतुकीबाबत सर्वांनी मिळून व्यवहार्य निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 17:37 IST

शिवाजी पुलावरील मिनीबस दुर्घटना ही वाहनचालकाच्या चुकीमुळे घडली आहे. त्यामुळे नवीन शिवाजी पूल वाहतुकीसाठी सुरू होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत जुना पूल वाहतुकीसाठी सुरू ठेवावा, अथवा बंद करावा याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांनी एकत्रित निर्णय घ्यावा लागेल, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

ठळक मुद्देशिवाजी पुलावरील मिनीबस दुर्घटना ही वाहनचालकाच्या चुकीमुळे स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये शिवाजी पूल धोकादायक नसल्याचे सिद्ध पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसार नवीन पुलाचे काम रखडलेनवीन पुलाचे ८० टक्के कामही पूर्ण वाहतुकीबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांनी एकत्रित निर्णय घ्यावा

कोल्हापूर : शिवाजी पुलावरील मिनीबस दुर्घटना ही वाहनचालकाच्या चुकीमुळे घडली आहे. त्यामुळे नवीन शिवाजी पूल वाहतुकीसाठी सुरू होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत जुना पूल वाहतुकीसाठी सुरू ठेवावा, अथवा बंद करावा याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांनी एकत्रित निर्णय घ्यावा लागेल, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

पालकमंत्री पाटील म्हणाले, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शिवाजी पुलाच्या बांधकामाचा विषय प्रलंबित असून, नवीन पुलाचे ८० टक्के कामही पूर्ण झाले आहे. तथापि, या ठिकाणी जुनी लेणी असल्याने पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसार २०० मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे या नवीन पुलाचे काम रखडले.

या कायद्यात बदल करून हे अंतर २०० मीटरवरून ५० मीटरपर्यंत कमी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. राज्यसभेमध्ये हे विधेयक मंजुरीसाठी आहे. ते मंजूर होऊन कायद्यात रूपांतरित होईपर्यंत हा पूल पूर्ण होऊ शकत नाही.

जरी या पुलाचे काम २० टक्के अपूर्ण असले, तरी बराच काळ हा पूल अपूर्ण असल्याने त्याची मजबूती तपासावी लागेल. हा पूल पूर्ण होऊन वाहतुकीसाठी उपलब्ध होईपर्यंत बराच कालावधी जाईल. त्यासाठी या पुलावरून वाहतुकीबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांनी एकत्रित निर्णय घ्यावा.शिवाजी पूल जरी १४० वर्षे जुना असला, तरी वेळोवेळी करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये हा पूल धोकादायक नसल्याचे सिद्ध झाले आहे. शुक्रवारची घटना ही वाहनचालकाच्या चुकीमुळे घडलेली आहे. जुन्या पुलावरून वाहतुकीबाबत सर्वांनी मिळून व्यवहार्य निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरAccidentअपघात