Kolhapur: कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाजवळ 'बर्निंग कार'; जीवितहानी नाही
By संदीप आडनाईक | Updated: May 19, 2024 23:23 IST2024-05-19T23:20:54+5:302024-05-19T23:23:30+5:30
Kolhapur News: शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास एका कारला आग लागली. अग्निशमन दलाच्या फायर फायटरने तातडीने आग विजवली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Kolhapur: कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाजवळ 'बर्निंग कार'; जीवितहानी नाही
- संदीप आडनाईक
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास एका कारला आग लागली. अग्निशमन दलाच्या फायर फायटरने तातडीने आग विजवली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कोल्हापुरहून कागलच्या दिशेने जाणारी एक कार रविवारी सायंकाळी शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर थांबली. या कारमधून धूर येत होता. चालकाने तत्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी फायर फायटर घटनास्थळी पाठवले, त्यांनी तत्काळ आग विझवली. ही माहिती अग्निशमन दलाने दिली.