शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

कोल्हापूर : बालिंगा येथील बोगस प्लॉट खरेदीमध्ये २६ लाखांचा गंडा, दहाजणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:16 PM

बालिंगा (ता. करवीर) येथे बनावट कागदपत्रांद्वारे मूळ मालकाच्या नावावरील रिकाम्या प्लॉटची विक्री करून २६ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी दहाजणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देबालिंगा येथील बोगस प्लॉट खरेदीमध्ये २६ लाखांचा गंडादहाजणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथे बनावट कागदपत्रांद्वारे मूळ मालकाच्या नावावरील रिकाम्या प्लॉटची विक्री करून २६ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी दहाजणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.संशयित रामचंद्र पुंडलिक सावरे (३३), त्याचा भाऊ बबन (३६, दोघे रा. गणेशनगर, शिंगणापूर), प्रशांत शेटे (३५, रा. कळंबा), अभिजित अंबादास बागडे (३५), स्वप्निल जगन्नाथ साळोखे (२८), विनोद उर्फ बाळू शिरगावे (३५), रोहन अनिल दाभाडे (२५, सर्व रा. जगतापनगर, पाचगाव), महावीर कापसे नावाची दस्त करून देणारी बनावट व्यक्ती, नसीर महंमद देसाई (४०, रा. नागाव), इनायत महंमद जमादार (३८, रा. यड्राव, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत.अधिक माहिती अशी, महावीर बाळासो कापसे यांच्या मालकीचा मौजे बालिंगा येथील गट नं. ८०/१ ब पैकी प्लॉट नं. ५, क्षेत्र २५७.२५ चौ. मी. हा प्लॉट रिकामा आहे. तो संशयित रामचंद्र सावरे याने अन्य साथीदारांच्या मदतीने जून २०१७ मध्ये महावीर कापसे यांच्या नावाचे बनावट मतदान ओळखपत्र तयार करून त्यांचा बालिंगा येथील प्लॉट दुय्यम निबंधक, करवीर क्र. २, कसबा बावडा येथील कार्यालयातून स्वप्निल जगन्नाथ साळोखे याच्या नावावर खरेदी केला.

खरेदीदस्तावेळी इनायत जमादार व नसीन देसाई यांना साक्षीदार म्हणून घेतले. त्यानंतर २ जानेवारी २०१८ रोजी शनिवार पेठ येथील आर. बी. पोवार स्टॅम्प व्हेंडर यांच्या कार्यालयात संचकारपत्र करून २९ जानेवारीला तोच प्लॉट रामचंद्र गुंडाप्पा भोसले (३७, रा. सावर्डे, ता. पन्हाळा) यांना दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्ताद्वारे सुमारे २६ लाख ८४ हजार रुपयांना विक्री केला.

भोसले प्लॉटचा ताबा घेण्यासाठी गेल्यानंतर प्लॉटचे मूळ मालक महावीर कापसे असल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी संशयित भामट्यांकडे पैशांची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली.

सावरे व त्याच्या साथीदारांनी अशा प्रकारे अनेकांना प्लॉट खरेदी-विक्रीमध्ये गंडा घातल्याची चर्चा आहे. त्यांना अटक केल्यानंतर मोठे रॅकेट उघडकीस येणार असल्याचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले. 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीkolhapurकोल्हापूरcrimeगुन्हेPoliceपोलिस