राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेवर ‘कोल्हापूर’ची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 17:06 IST2018-11-22T17:01:44+5:302018-11-22T17:06:15+5:30

क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत सतरा वर्षांखालील मुलांमध्ये क्रीडा प्रबोधिनी संघाचा, तर एकोणीस वर्षांखालील मुलींमध्ये मुंबई विभागाचा पराभव करीत कोल्हापूर

Kolhapur blooms on state-level school football competition | राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेवर ‘कोल्हापूर’ची मोहोर

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेवर ‘कोल्हापूर’ची मोहोर

ठळक मुद्देसतरा वर्षांखालील मुलांमध्ये क्रीडा प्रबोधिनीचाएकोणीस वर्षांखालील मुलींमध्ये मुंबई विभागाच्या संघाने विजेतेपद पटकाविले.

कोल्हापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत सतरा वर्षांखालील मुलांमध्ये क्रीडा प्रबोधिनी संघाचा, तर एकोणीस वर्षांखालील मुलींमध्ये मुंबई विभागाचा पराभव करीत कोल्हापूर विभाग संघाने बुधवारी विजेतेपदावर मोहोर उठविली.

विभागीय क्रीडा संकुल येथे बुधवारी १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर विभाग (महाराष्ट्र हायस्कूल)ने क्रीडा प्रबोधिनी (पुणे)चा ३-० असा धुव्वा उडवित विजेतेपदावर मोहर उठविली. कोल्हापूरकडून अभिषेक भोपळे, विश्व शिंदे, खुर्शीद अली यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद केली. तत्पूर्वी कोल्हापूर विभागाने पुणे विभागाचा टायब्रेकरवर ५-३ असा पराभव करीत, तर क्रीडा प्रबोधिनी संघाने नाशिक विभागाचा ४-० असा पराभव करीत, अंतिम फेरी गाठली होती.

विजयी संघात (कोल्हापूर विभाग, महाराष्ट्र हायस्कूल) - श्रीतेज मिरजकर, ओंकार चौगुले, विराज साळोखे, खुर्शीद अली, विशाल पाटील, जय कामत, अभिषेक भोपळे, रोहित देसाई, निरंजन कामते, संदेश कासार, विश्व शिंदे, सिद्धीक नायकवडी, संकेत बुचडे, मयुरेश भोसले, पृथ्वीराज पवार, प्रथमेश पवार, संकेत गिड्डे, सोमेश मेटिल , प्रशिक्षक प्रदीप साळोखे, संतोष पवार, शरद मेढे यांचा समावेश होता.

शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या एकोणीस वर्षांखालील मुलींमध्ये अंतिम सामन्यात कोल्हापूर विभाग (काडसिद्धेश्वर हायस्कूल, कणेरी)ने मुंबई विभाग (फादर अ‍ॅग्लो स्कूल)चा ४-० असा धुव्वा उडवित विजेतेपदावर नाव कोरले. कोल्हापूरकडून तेजस्विनी कोळसे हिने तीन, तर सानिका चौगुले हिने एक गोलची नोंद केली. तत्पूर्वी उपांत्य सामन्यांत कोल्हापूर विभागाने पुणे विभागाचा ४-० असा पराभव करीत, तर मुंबई विभागाने अमरावती विभागाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.

विजयी संघात अर्पिता पवार, सोनाली साळवी, सोनाली सुतार, निशा पाटील, जुलेखा बिजली, शाहीन मुल्लाणी, पौर्णिमा साळे, श्रृतिका चौगले, सरस्वती माळी, सानिका चौगले, ऋतुजा पाटील, तेजस्विनी कोळसे, पूनम शिंदे, सानिका पाटील, नम्रता यादव, कोमल डाफळे, सिमरन नावळेकर, स्नेहल कांबळे, प्रशिक्षक अमित शिंत्रे, शैलेश देवणे यांचा समावेश होता.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सदस्या मधुरिमाराजे यांच्या हस्ते झाला. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, के. एस. ए. सचिव माणिक मंडलिक, विनय पाटील, आर. डी. पाटील, एस. ए. रामाणे, जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे, सचिन पांडव, प्रा. अमर सासने, सुमित पाटील, राजेंद्र बुवा, आदी मान्यवर उपस्थित होते.

 २१११२०१८ - कोल-फुटबॉल वूमेन्स
 कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींमध्ये विजेतेपद पटकाविणाऱ्या कोल्हापूर विभाग (काडसिद्धेश्वर हायस्कूल) संघास बुधवारी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सदस्या मधुरिमाराजे यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
--------
पाच विजेतेपद
यंदाच्या राज्यस्तरीय शालेय खेळ हंगामात महाराष्ट्र हायस्कूलने कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करताना मुलांमध्ये १४, १७ वर्षांखालील सुब्रतो मुखर्जी चषक व राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत विजेतेपद, तर १९ वर्षांखालील गटात उपविजेतेपद पटकाविले. अशी कामगिरी करणारा राज्यातील कोल्हापूर विभागाचा हा संघ एकमेव ठरला आहे.
--------
फोटो : २१११२०१८-कोल-फुटबॉल बॉईज
ओळी : कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांमध्ये विजेतेपद पटकाविणाºया कोल्हापूर विभाग (महाराष्ट्र हायस्कूल) संघास बुधवारी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सदस्या मधुरिमाराजे यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
----
सर्व छाया : नसीर अत्तार

Web Title: Kolhapur blooms on state-level school football competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.