कोल्हापूर : भाजप-आरएसएस मुस्लिमविरोधी नाही  : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 18:29 IST2018-12-06T18:28:29+5:302018-12-06T18:29:59+5:30

कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंगचे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी पूर्ण पाठबळ देण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Kolhapur: BJP-RSS is not anti-Muslim: Chandrakant Patil | कोल्हापूर : भाजप-आरएसएस मुस्लिमविरोधी नाही  : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : भाजप-आरएसएस मुस्लिमविरोधी नाही  : चंद्रकांत पाटील

ठळक मुद्देभाजप-आरएसएस मुस्लिमविरोधी नाही  : चंद्रकांत पाटील मुस्लिम बोर्डिंगला सदिच्छा भेट, मुस्लिम समाजातील मागास जातींच्या आरक्षणासाठी प्रयत्नशील

कोल्हापूर : मी हिंदू-मुस्लीम असा भेदाभेद मानत नाही. त्यामुळे आपणही भाजप आणि आरएसएस हे मुस्लिमविरोधी आहे असे मानण्याची गरज नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी मांडलेल्या सर्व प्रश्नांकडे आपण जाणीपूर्वक लक्ष देणार आहोत. कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंगचे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी पूर्ण पाठबळ देण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

गुरुवारी दुपारी त्यांनी येथील दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगला सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली.

धर्मावर आधारित आरक्षण मिळणार नसल्यामुळे मुस्लिम समाजातील उर्वरित मागास जातींच्या आरक्षणासाठी आपण प्रयत्नशील आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर आदिल फरास कादर मलबारी यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले यावेळी जिल्ह्यातून आलेल्या मुस्लिम बांधवांच्या प्रतिनिधींनी आपापली मते मांडली.

Web Title: Kolhapur: BJP-RSS is not anti-Muslim: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.