शहरं
Join us  
Trending Stories
1
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
2
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
4
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
5
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
6
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
7
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
8
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
9
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
10
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
12
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
13
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
14
"आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही"; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा दावा
15
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
16
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
18
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
19
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
20
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बायोमेट्रिक रेशनिंगमध्ये आजऱ्यासह चार तालुके राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 18:48 IST

आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आलेल्या बायोमेट्रिक रेशनिंगच्या ‘ई-पीडीएस’ प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये मार्च महिन्यात कोल्हापूर जिल्'ातील आजऱ्यासह कागल, भुदरगड व राधानगरी या तालुक्यांनी राज्यातील पहिल्या चार तालुक्यांमध्ये स्थान पटकाविले आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या प्रयत्नानेच बायोमेट्रिक प्रणालीमध्ये राज्यातील कोल्हापूरचे आघाडीवरील स्थान अद्याप कायम राहिले आहे.

ठळक मुद्देबायोमेट्रिक रेशनिंगमध्ये आजऱ्यासह चार तालुके राज्यात अव्वलशासनाकडून मार्च महिन्यातील आकडेवारी जाहीर कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागाचे प्रयत्न

प्रवीण देसाई

कोल्हापूर : आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आलेल्या बायोमेट्रिक रेशनिंगच्या ‘ई-पीडीएस’ प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये मार्च महिन्यात कोल्हापूर जिल्'ातील आजऱ्यासह कागल, भुदरगड व राधानगरी या तालुक्यांनी राज्यातील पहिल्या चार तालुक्यांमध्ये स्थान पटकाविले आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या प्रयत्नानेच बायोमेट्रिक प्रणालीमध्ये राज्यातील कोल्हापूरचे आघाडीवरील स्थान अद्याप कायम राहिले आहे.रेशनकार्डावर निव्वळ आधारपडताळणीअंती करण्यात आलेल्या धान्य वाटपाची राज्य शासनाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली मार्च महिन्याची टक्केवारी पाहता, पहिल्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूर जिल्तील आजरा तालुक्याने देखील राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्रथम स्थान पटकावत ९७.०५ टक्के इतक्या रेशनकार्डांवर धान्यवाटप केले आहे.

त्यापाठोपाठ कागल ९१.९० टक्के, भुदरगड ९१.०९ टक्के व राधानगरी ९०.०९ टक्के अशा प्रकारे जिल्'ातील एकूण ४ तालुक्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक धान्य वाटप करून राज्यात पहिल्या पाचमध्ये येण्याचा बहुमान मिळविला आहे.विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्'ातील उर्वरित सर्वच तालुक्यांनीदेखील ८० टक्क्यांहून अधिक रेशनकार्डांवर निव्वळ आधारपडताळणी अंती धान्य वाटप करून राज्यात बायोमेट्रिक रेशनिंगमध्ये मार्गदर्शक जिल्हा म्हणून आपली ओळख कायम केली आहे.

या यशापाठोपाठ, कोणीही रेशनकार्डधारक कोणत्याही रेशनदुकानांतून धान्य घेऊ शकेल अशी ‘पोर्टेबिलिटी’ची योजना, मोबाईल मेसेजद्वारे लाभार्थी रेशनकार्डधारकाला त्याने धान्य घेताच त्याच्या मोबाईलवर माहिती मिळणे, आॅनलाईन रेशनकार्ड मिळणे आदी सुविधांदेखील लवकरच कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने जोरदार तयारी केली आहे.

 

लवकरच तांत्रिक अडचणी दूर करण्यात येऊन जिल्'ातील अन्न सुरक्षा योजनेच्या सुमारे साडेपाच लाख इतक्या कुटुंबांतील सुमारे २५ लाख इतके लाभार्थी असलेल्या सर्वच्या सर्व शंभर टक्के रेशनकार्डावर निव्वळ आधार पडताळणीअंती धान्य वाटप करणारा जिल्हा असा लौकिक राज्यातच नव्हे तर देशातही कोल्हापूरला मिळेल. त्यादृष्टीने पुरवठा विभागाचे प्रयत्न सुरु आहेत.- विवेक आगवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी

 

बायोमेट्रिक रेशनिंगची टक्केवारीतालुका       एकूण रेशनकार्ड               ‘आधार’वर धान्यवाटप झालेली रेशनकार्ड          टक्केवारीआजरा             १९७९८                                                            १९२१४                        ९७.०५भुदरगड           २५८३७                                                            २३५३५                         ९१.०९कागल             ४१४१७                                                            ३८०६४                          ९१.९०राधानगरी        ३३६४५                                                           ३०४०७                            ९०.३७ 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार