कोल्हापूर : महापौरपदासाठी सरिता मोरे - जयश्री जाधव यांच्यात लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 18:18 IST2018-12-05T18:17:30+5:302018-12-05T18:18:48+5:30
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून सरिता नंदकुमार मोरे तर भाजपकडून जयश्री चंद्रकांत जाधव यांनी तसेच उपमहापौरपदासाठी कॉँग्रेसकडून भूपाल महिपती शेटे तर भाजपकडून कमलाकर यशवंत भोपळे यांनी अर्ज भरले.

कोल्हापूर : महापौरपदासाठी सरिता मोरे - जयश्री जाधव यांच्यात लढत
कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि भविष्यकाळातील राजकीय गणिते स्पष्ट करणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून सरिता नंदकुमार मोरे तर भाजपकडून जयश्री चंद्रकांत जाधव यांनी तसेच उपमहापौरपदासाठी कॉँग्रेसकडून भूपाल महिपती शेटे तर भाजपकडून कमलाकर यशवंत भोपळे यांनी अर्ज भरले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरुन जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरल्यामुळे या निवडणुकीत अनपेक्षित रंग भरला आहे. कॉँग्रेस - राष्ट्रवादीचे नेतेही त्यामुळे दक्ष झाले असून पक्षातर्फे सर्वांना व्हीप बजावणे, तसेच नगरसेवकांना सहलीवर पाठविण्याची तयारी सुरु झाली आहे.