कोल्हापूर : बॅनरवाद पेटला,  फुलेवाडीत रिंकू देसाईंच्या घरावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 12:42 PM2022-05-29T12:42:10+5:302022-05-29T12:42:27+5:30

फुलेवाडी रिंगरोडवरील विजयसिंह उर्फ रिंकू देसाई यांच्या घरावर अज्ञातांनी पहाटेच्या सुमारास दगडफेक करून हल्ला केला. 

Kolhapur Banner war attack on social worker Rinku Desais house in Phulewadi | कोल्हापूर : बॅनरवाद पेटला,  फुलेवाडीत रिंकू देसाईंच्या घरावर हल्ला

कोल्हापूर : बॅनरवाद पेटला,  फुलेवाडीत रिंकू देसाईंच्या घरावर हल्ला

Next

कोल्हापूर: फुलेवाडी रिंगरोडवरील विजयसिंह उर्फ रिंकू देसाई यांच्या घरावर अज्ञात तिघांनी रविवारी पहाटेच्या सुमारास दगडफेक करून हल्ला केला. हल्लेखोरांचा सुमारे अर्धा तास धुमाकूळ सुरू होता. हल्लेखोरांनी घराच्या काचा फोडल्या, दारातील कुंड्या दरवाजावर फेकून प्रचंड दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत तिघांना अटक केली आहे. पंधरा दिवसापूर्वी रिंकू देसाई याच्ंया वाढदिवसांचे फलक फाडल्यावरून लक्षतीर्थ वसाहतमधील दोघा तरूणांवर हल्ला करण्यात आला होता, त्याचेच पडसाद रविवारी पहाटे प्रतिहल्लाने उमटले.

रविवारी पहाटेच्या सुमारास रिंकू देसाई यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला. हल्ल्यात बंगल्याच्या खिडकीच्या काचा, झाडांच्या कुंड्या फोडत प्रचंड दगडफेक करत दहशत माजविली. सुमारे अर्धा तास हा हल्लेखोरांचा धिंगाणा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. हल्ला करणाऱ्यांनी तोंडाला रुमाल बांधून दगडफेक करत प्रचंड दहशद माजवली. मोठ्याने आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिक जागे झाले. बाहेर येऊन पाहिले असता तीन तरुण देसाई यांच्या घरावर दगडफेक करत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ त्याबाबची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.

करवीर आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. परिसरात हल्लेखोरांसाठी शोध मोहीम राबवली, त्यावेळी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले. तर सकाळी आणखी दोन संशयितांना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. त्याबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.   

किराणा दुकानाचीही तोडफोड
हल्लेखोरांनी भोगम पार्क परिसरातील किराणा स्टोअर्सची मोडतोड केली. दुकानाबाहेरील फरश्या उचकटून टाकून शटरवर दगडफेक करण्यात आली.

Web Title: Kolhapur Banner war attack on social worker Rinku Desais house in Phulewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.