शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील महामंडळाने स्वनिधीतून कर्ज द्यावे, मागणीसाठी काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 13:43 IST

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने बेरोजगारांना स्वनिधीतून कर्ज द्यावे, ५० टक्के कर्ज महामंडळाकडून, ४५ टक्के सबसिडी व केवळ पाच टक्के रक्कम कर्जदाराकडून भरून घ्यावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने भवानी मंडपातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देअण्णासाहेब पाटील महामंडळाने स्वनिधीतून कर्ज द्यावे मागणीसाठी उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने बेरोजगारांना स्वनिधीतून कर्ज द्यावे, ५० टक्के कर्ज महामंडळाकडून, ४५ टक्के सबसिडी व केवळ पाच टक्के रक्कम कर्जदाराकडून भरून घ्यावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने भवानी मंडपातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या महामंडळाने जाहीर केलेल्या योजनांचा मराठा समाजाला लाभ होत नाही. बिनव्याजी कर्ज ही धूळफेक आहे. अन्य महामंडळे स्वनिधीतून कर्ज योजना राबवीत असताना येथे मात्र बँकांद्वारे कर्ज देण्यात येणार आहे.

अर्जदारांचे प्रस्ताव बँकेकडे पाठविणे व १२ टक्क्यांपर्यंतचे व्याज देणे एवढेच काम महामंडळ करणार आहे. दुसरीकडे, बँका बेरोजगार तरुणांना दाद देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. महामंडळ फक्त दरमहा व्याज लाभार्थ्याच्या नावावर भरणार आहे. त्यामुळे या योजनेचे स्वरूप कर्ज नव्हे, तर व्याज योजना असे झाले आहे.

त्यामुळे शासनाने मूळ मागण्या मान्य करून आर्थिक मागास समाजाला दिलासा द्यावा. यावेळी संजय पाटील, लाला भोसले, प्रथमेश तेली, अभिजित शिंदे, तानाजी मोरे, युवराज शिंदे, अभय पाटील, प्रदीप पाटील, किशोर आयरे, अजय रसाळ, दत्ता लांडगे, जहाँगीर मुल्ला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :Governmentसरकारcongressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर