शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Gunaratna Sadavarte: अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी, न्यायालयात स्वत:च मांडली बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 17:03 IST

कोल्हापूर : मराठा समाज व मागासगर्वीय समाज यांच्यात जातीय तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेल्या ...

कोल्हापूर : मराठा समाज व मागासगर्वीय समाज यांच्यात जातीय तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कोल्हापूरपोलिसांनी अटक केलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते याला आज, गुरुवारी दुपारी जिल्हा न्यायालयाने सोमवारपर्यत पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयात सुमारे तासभर दोन्ही बाजूंनी युक्तीवाद मांडल्यानंतरनंतर मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. पी. गायकवाड यांनी दुपारच्या सत्रात हा निर्णय दिला. त्याला पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणल्यानंतर प्रचंड गर्दी उसळली होती. सरकारपक्षातर्फ सहायक सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी तर फिर्यादीचे वकील ॲड. शिवाजीराव राणे यांनी बाजू मांडली.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मीडियाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत मराठा व मागासवर्गीय समाज यांच्यात जातीय तेढ निर्माण होईल असे चिथावणीखोर वक्तव्य केल्याने सकल मराठा मोर्चाचे समान्वयक दिलीप पाटील यांनी ॲड. सदावर्ते यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.न्यायालयात पोलीस प्रशासनातर्फे शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांनी तक्रारीची माहिती दिली. त्यानंतर सहायक सरकारी वकील आम्रपाली कस्तूरे व ॲड. शिवाजीराव राणे यांनी न्यायालयात बाजू मांडताना सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. त्यावेळी ॲड. पीटर बारदेस्कर व स्वत: ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी बाजू मांडताना, माझ्या वक्तव्याचे व्हीडीओ सोशल मीडीयावर आहेत त्याची चौकशी करावी, माझ्या आवाजाचे नमूणे सातारा येथे घेतले आहेत, त्याशिवाय आवश्यक असतील तर न्यायालयीन कोठडीत घेता येतील, तसेच मे २०२१ मध्ये माझ्याकडून झालेल्या वक्तव्यावर दंगे झाले नाहीत, तर आताच इतक्या उशीरा गुन्हे का दाखल केले. त्यामुळे मला पोलीस कोठडी देण्याची आवश्यता नाही, अशी बाजू मांडली. त्यावर न्यायालयाने त्याला दुपारच्या सत्रात पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.न्यायालयात गर्दीबुधवारी त्याला ऑर्थर रोड कारागृहातून कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुरुवारी पहाटे कोल्हापूरात आणले. रात्रभर राजारामपूरी पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवले. सकाळी साडेअकरा वाजता त्याला पोलीस बंदोबस्तात जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयात सुनावणी ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयPoliceपोलिस