शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कोल्हापूर : सात ठिकाणी मटक्यावर कारवाई; १० जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 12:19 IST

कोल्हापूर शहरासह विविध ठिकाणी व करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटका अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी छापे टाकून १० जणांना अटक केली.

ठळक मुद्देसात ठिकाणी मटक्यावर कारवाई; १० जणांना अटक१७ हजार ८१५ रुपये जप्त : गुन्ह्याची कारवाई

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह विविध ठिकाणी व करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटका अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी  छापे टाकून १० जणांना अटक केली.या छाप्यांतून १७ हजार ८१५ रुपये जप्त केले. करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्र्वाधिक तीन, तर लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दींत प्रत्येकी एक अशा एकूण सात ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली.पोलिसांनी सांगितले की, शिवाजी उद्यमनगर परिसरात संशयित इकबाल रहिमान शेख (वय ३०, रा. बापूरामनगर, कळंबा) हा मटका घेत असताना अटक केली. संशयित राहुल पाटील (रा. यादवनगर, कोल्हापूर) हा मटका अड्ड्याचा मालक आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शेखकडून ४२०५ रुपये जप्त केले. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल आहे.याचबरोबर संशयित मोहन पप्पू सकट (रा. सदर बाजार, कोल्हापूर) व अभिजित यादव (रा. जवाहरनगर, कोल्हापूर) या दोघांना पकडून त्यांच्याकडून १५०५ रुपये जप्त केले. त्यांच्यावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच संशयित विनायक धोंडीराम चौगले (रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) व राजू यादव (रा. लक्ष्मीपुरी ) यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांच्याकडून १७८५ रुपये जप्त केले. देवकर पाणंद येथील संशयित अण्णाप्पा गुंडाप्पा नाईक (रा. मनोरमानगर) यांच्यावर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून ११५५ रुपये जप्त केले.दरम्यान, करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटकाप्रकरणी संशयित रोहित धनंजय भंडवले (रा. नागोजीराव पाटणकर हायस्कूलजवळ) याच्याकडून ३६४० रुपये; तर वडणगे (ता. करवीर) येथील आनंदा हरी तांबेकर यांच्याकडून ३९४० रुपये आणि मोहन दत्तू घूमकर (रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर), मनोज शिवकुमार पिसे (रा. फुलेवाडी) या दोघांकडून १५८५ रुपये जप्त केले. या सर्वांवर करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर