शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : दूधगंगेतून ७५०० हजार घनफुटांचा विसर्ग, जोर ओसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 18:36 IST

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी रिपरिप कायम आहे. धरणक्षेत्रात मात्र जोरदार पाऊस कोसळत असल्याने जलविसर्ग वाढला असून, दूधगंगा धरणातून प्रतिसेकंद ७५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्दे दूधगंगेतून ७५०० हजार घनफुटांचा विसर्ग, जोर ओसरलापण रिपरिप कायम : पंचगंगा ३२ फुटांवर

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी रिपरिप कायम आहे. धरणक्षेत्रात मात्र जोरदार पाऊस कोसळत असल्याने जलविसर्ग वाढला असून, दूधगंगा धरणातून प्रतिसेकंद ७५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून पंचगंगा ३२ फुटांपर्यंत पोहोचली आहे. सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पसरले असून, पंचगंगेचे पाणीही काठावरील शिवारांत शिरले आहे.गेले दोन दिवस जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस थोडा कमी झाला असला तरी दिवसभरात अधूनमधून रिपरिप कायम राहिली आहे. गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे.

धरणक्षेत्रातही सरासरी ८५ मिलिमीटर पाऊस झाल्याने विसर्ग वाढला आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ४४५६, ‘वारणा’तून ६०८८, तर दूधगंगा धरणातून तब्बल ७५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सर्वच नद्यांच्या जलपातळीत झपाट्याने वाढ होत असून नद्यांचे पाणी पात्राबाहेर पसरले आहे.

मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ३२.५५ मिलिमीटर पाऊस झाला. यावेळी पंचगंगेची पातळी २८ फुटांवर होती. दिवसभरात त्यात चार फुटांची वाढ होऊन पातळी ३२ फुटांपर्यंत पोहोचल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यात ७४ मालमत्तांची पडझड होऊन १४ लाख २१ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

शेतीकामांवर परिणामगेले चार दिवस पाऊस जोरात सुरू असल्याने शेतीची कामे थंडावली आहेत. भांगलण व खतांचा डोस देण्याचे काम खोळंबले आहे.

तालुकानिहाय पाऊस असा-हातकणंगले (५.७५), शिरोळ ( ३.१४), पन्हाळा (२३.२९), शाहूवाडी (५४.३३), राधानगरी (४७.८३), गगनबावडा (६२.५०), करवीर (१८.२७), कागल (२५.२९), गडहिंग्लज (१४.८५), भुदरगड (४२.८०), आजरा (४४.५५), चंदगड (४९.८३). 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Rainपाऊसkolhapurकोल्हापूरDamधरण