शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कोल्हापूर :महापालिका कर्मचाऱ्यांतर्फे स्मशानभूमीस ५० हजार शेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 5:32 PM

कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून शनिवारी महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने ५० हजार शेणी पंचगंगा स्मशानभूमीस प्रदान करण्यात आल्या. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या हस्ते महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या शेणींचा स्वीकार केला.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिका कर्मचाऱ्यांतर्फे स्मशानभूमीस ५० हजार शेणी

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून शनिवारी महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने ५० हजार शेणी पंचगंगा स्मशानभूमीस प्रदान करण्यात आल्या. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या हस्ते महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या शेणींचा स्वीकार केला.महापालिका कर्मचाऱ्यांकडून गेली सहा वर्षे पंचगंगा स्मशानभूमीस शेणी प्रदान करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रथम १० हजार शेणी, दुसऱ्या वर्षी २० हजार शेणी, तिसऱ्या वर्षी ३० हजार, फायर एक्स्टिंग्युशर तसेच भिंतीवरील मोठे घड्याळ व चौथ्या वर्षी ३० हजार शेणी, पाचव्या वर्षी ४० हजार व या वर्षी ५० हजार शेणी प्रदान करण्यात आल्या.यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, महिला व बालकल्याण सभापती सुरेखा शहा, प्राथमिक शिक्षण सभापती अशोक जाधव, सभागृह नेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे व महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर