कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी कोल्हापुरात आज, गुरुवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही तासांतच मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला, तो पुढे दुपारपर्यंत कायम टिकून राहिला.
दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५०.८५ टक्के मतदान झाले. सकाळी ९.३० वाजेपर्यंत केवळ ९.६४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासांत मतदानाचा वेग किंचित वाढला असून, ११.३० वाजेपर्यंत शहरात एकूण २२.४५ टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये ६०,५३१ पुरुष आणि ५०,५४७ महिला अशा एकूण ११,१०८५ मतदारांनी आपला हक्क बजावला. दुपारी १.३० वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली होती. यामध्ये ९५,६६१ पुरुष आणि ८७,३६१ महिला अशा एकूण १८,३०३० मतदारांनी आपला हक्क बजावला.
वाचा : काँग्रेस-भाजपच्या उमेदवारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकइचलकरंजी महानगरपालिकेसाठी ३.३० वाजेपर्यंत ४६.२३ टक्के मतदान झाले. दुपारी १.३० पर्यंत ३१.२९ टक्के मतदान झाले होते. पिंक मतदान केंद्रावर सेल्फी पॉइंटला महिला, युवतींनी सेल्फी घेत मतदानाचा आनंद लुटला. पहिल्या दोन तासांमध्ये ७.८८ टक्के तर ११.३० वाजेपर्यंत १८.५७ टक्के मतदान झाले होते.
वाचा : कोल्हापुरातील नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार, सात ठिकाणी मतदान केंद्रात तांत्रिक बिघाड
मतदानासाठी मतदारांचा उत्साह टिकून राहिल्याने दुपारर्यंत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार राहुल आवाडे, मौसमी आवाडे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
Web Summary : Kolhapur saw 37% and Ichalkaranji 31.29% voter turnout by 1:30 PM in municipal elections. Early enthusiasm continued, with significant participation from both men and women voters. Key figures like Kallappanna Awade also cast their votes.
Web Summary : नगर निगम चुनावों में दोपहर 1:30 बजे तक कोल्हापुर में 37% और इचलकरंजी में 31.29% मतदान हुआ। पुरुषों और महिलाओं दोनों मतदाताओं की महत्वपूर्ण भागीदारी के साथ, शुरुआती उत्साह जारी रहा। कल्लाप्पाण्णा आवाडे जैसी प्रमुख हस्तियों ने भी मतदान किया।