शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

कोल्हापूर : आडवाटेवरचं कोल्हापूर, पर्यटन सहलीत १४०० पर्यटकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 14:26 IST

आडवाटेवरचं कोल्हापूर या नाविन्यपूर्ण पर्यटन सहल उपक्रमात जवळपास १४०० पर्यटकांचा सहभाग होता. कोल्हापूरला पर्यटन विश्वात वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आडवाटेवरचं कोल्हापूर हा नाविन्यपूर्ण उपक्रम असून पर्यटकांनी या सहलीचा, निसर्गाचा सुखद आनंद घ्यावा, नवं पहा, आनंद घ्या आणि पुन्हा या ! अशी सादही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पर्यटकांना घातली.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभनवं पहा, आनंद घ्या आणि पुन्हा या, सहभागी होण्यासाठी सादसहलीमध्ये अन्य जिल्ह्यातीलही पर्यटकांनी सहभागी व्हावे -पालकमंत्री

कोल्हापूर : आडवाटेवरचं कोल्हापूर या नाविन्यपूर्ण पर्यटन सहल उपक्रमात जवळपास १४०० पर्यटकांचा सहभाग होता. कोल्हापूरला पर्यटन विश्वात वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आडवाटेवरचं कोल्हापूर हा नाविन्यपूर्ण उपक्रम असून पर्यटकांनी या सहलीचा, निसर्गाचा सुखद आनंद घ्यावा, नवं पहा, आनंद घ्या आणि पुन्हा या ! अशी सादही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पर्यटकांना घातली.हिल रायडर्स फाऊंडेशन व ॲक्टिव्ह चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित केलेल्या आडवाटेवरचं कोल्हापूर या उपक्रमांतर्गत २६ मे अखेर आयोजित केलेल्या १४ पर्यटन सहलींचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि चित्रपट अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

शाहू स्मारक येथून आजच्या पर्यटन सहलीच्या २ बसेसना पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि चित्रपट अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखवून या गाड्या सहलीसाठी रवाना करण्यात आल्या.

या समारंभास अंजली चंद्रकांत पाटील, चित्रपट अभिनेते भरत जाधव यांच्या पत्नी डॉ. सरीता जाधव, प्रमोद पाटील, डॉ.अमर अडके, उदय गायकवाड, अनिल चौगुले, अनंत खासबागदार, चारुदत्त जोशी, विद्याप्रबोधनीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे, सहकार विभागाचे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव आदी मान्यवर उपस्थित होते.कोल्हापूरमध्ये पर्यटन विकासाची मोठी क्षमता आणि संधी असून अनेक ठिकाणे पर्यटकांसाठी अनोळखी आहेत. आडवाटेवरचं कोल्हापूर अशा सहलींच्या माध्यमातून कोल्हापूरातील नव नवीन पर्यटन स्थळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यातील पर्यटकांना पाहण्यास तसेच अनुभवण्याची नामी संधी मिळणार असल्याचे स्पष्ट करून राज्याच्या अन्य जिल्ह्यातील निम्म्या पर्यटकांचा सहभाग घेतला जाईल.

या उपक्रमातून जवळपास १४०० पर्यटकांना कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक, निसर्ग पर्यटनाचा ठेवा पहायला मिळणार आहे, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे व्यक्त केले. पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या पर्यटनाच्या इतिहास लिहिला जाईल तेंव्हा आडवाटेवरचं कोल्हापूर हा उपक्रम कोल्हापूरच्या पर्यटन इतिहासातील लौकीकपात्र बाब ठरणार आहे.

या उपक्रमांतर्गत आठवड्यातून दोन दिवस महिला आणि पुरूषांसाठी स्वतंत्र सहलींचे आयोजन करण्यात आले असून आज पुरूषांसाठीच्या पहिल्या सहलीच्या शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या सहली २६ मे पर्यंत आयोजित करण्यात आल्या आहेत. या दोन- दोन दिवसांच्या सहली दरम्यान प्रवास, निवास, न्याहरी व भोजन व्यवस्था संपूर्णत: मोफत करण्यात आली आहे. आजपासून सुरू झालेल्या या सहलीचा पर्यटकांना लाभ घेता यावा यासाठी वल्ली Unexplored Kolhapur या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आडवाटेवरचं कोल्हापूर या उपक्रमाचा जिल्ह्यातील तसेच राज्याच्या अन्य जिल्ह्यातील पर्यटकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

कोल्हापूरच्या पर्यटन वृध्दीसाठी गेल्या २० वर्षापूर्वी सुचलेली कल्पना आज प्रत्यक्षात आली आहे, याचे समाधान व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या दोन दिवसांच्या या सहलींमध्ये गौतम बुध्द, सम्राट अशोक, सातवाहन, यादव, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या राजवटीतील अनेक वारसास्थळ, शीला लेख, गुहा, वास्तु, गड, मंदिरे व युध्दभूमीचा समावेश आहे.

जागतिक वारसास्थळ असणाऱ्या जंगलात निवास व नदी काटी व धरणांचा जलाशय, देवराई, रानमेवा यांचा आनंद घेत निसर्ग भ्रमंती करता येणार आहे. शिवाय निरभ्र आकाश दर्शनासह, जंगलट्रेक व लोककला यांचा अनुभव पर्यटकांना मिळणार आहे. स्थानिक पदार्थ, मसाले व वस्तुंची खरेदीही पर्यटकांना करता येणार आहे.कोल्हापूरच्या पर्यटनवृध्दीसाठी रोज नवनवे उपक्रम आणि प्रकल्प हाती घेतले जात असून आडवाटेवरचं कोल्हापूर हा एक महत्वकांक्षी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. कोल्हापूरातील गोर-गरीब जनतेला पाच रूपयात दोन चपात्या-भाजी देण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा उद्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी शुभारंभ करण्यात येणार आहे, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.हिल रायडर्स फाऊंडेशन व ॲक्टिव्ह चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित केलेल्या आडवाटेवरचं कोल्हापूर या सहलीच्या उपक्रमास कोल्हापूर हॉटेल मालक संघ,विविध संघटना, तज्ञ मार्गदर्शक व बचत गटांचे सहकार्य लाभले आहे.

पर्यटकांनी या सहलीचा मनमुराद आनंद घ्यावा, नव पहा, आनंद घ्या आणि सुखरूप परत या, अशा शुभेच्छाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. यावेळी उपस्थित पर्यटकांशी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधून पर्यटन सहलीच्या नव्या अनुभवाची माहिती दिली व शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरtourismपर्यटनBharat Jadhavभरत जाधव