शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पाचगाव खूनप्रकरणी दोन्ही गटांच्या ११ जणांना आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 18:17 IST

संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या व पाचगाव (ता. करवीर) येथे राजकीय वर्चस्ववादातून माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक मारुती पाटील व धनाजी तानाजी गाडगीळ यांच्या खून खटल्यात दोन्हीही गटांच्या एकूण ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देपाचगाव खूनप्रकरणी दोन्ही गटांच्या ११ जणांना आजन्म कारावासराजकीय वर्चस्ववादातून घटना : खुनाचा बदला खूनअशोक पाटील, धनाजी गाडगीळ यांचे झाले खून; चौघे निर्दोष

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या व पाचगाव (ता. करवीर) येथे राजकीय वर्चस्ववादातून माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक मारुती पाटील व धनाजी तानाजी गाडगीळ यांच्या खून खटल्यात दोन्हीही गटांच्या एकूण ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली.पाटील यांच्या खूनप्रकरणी दिलीप अशोक जाधव ऊर्फ डी. जे. (वय ३९), अमोल अशोक जाधव (२९, दोघेही रा. रुमाले मळा, माळवाडी पाचगाव), हरीष बाबूराव पाटील (३८, तिटवे, ता. राधानगरी), ओंकार विद्याधर सूर्यवंशी (२३, रा. सिद्धनगर, निपाणी), महादेव ऊर्फ हेंमत म्हसगोंडा कलगुटकी (२६, रा. वड्डवाडी, राजारामपुरी, कोल्हापूर, मूळ सांगली), तसेच गाडगीळ याच्या खूनप्रकरणी मिलिंद अशोक पाटील (३०), महेश अशोक पाटील (२८), अक्षय जयसिंग कोंडेकर (३०) निशांत ऊर्फ मुन्ना नंदकुमार माने (२५), प्रमोद कृष्णात शिंदे (२८), गणेश कलगुटकी (२६, सर्व रा. पाचगाव, ता. करवीर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. तर सबळ पुराव्याअभावी गाडगीळ खूनप्रकरणातून सुनील बाजीराव घोरपडे (५२), रहिम सनदी (३४), माजी नगरसेवक अमोल माने (५२), अजित कोरे (५४, सर्व रा. पाचगाव) यांची निर्दोष मुक्तता केली. यामध्ये २३ साक्षीदार तपासले त्यापैकी चारजण फितूर झाले. निर्दोष झालेल्यांतील अजित कोरे यांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. शिक्षा झालेल्यांमध्ये दोन कुटुंबांतील चार भावंडांचा समावेश आहे.अशोक जाधव खूनप्रकरणी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. विवेक शुक्ल यांनी, तर गाडगीळ खूनप्रकरणी विशेष सरकारी वकील श्रीकांत जाधव व त्यांचे सहायक अ‍ॅड. विश्वजित घोरपडे यांनी काम पाहिले.दि. १३ फेब्रुवारी २०१३ ला भर दुपारी न्यू महाद्वार रोडवरील अ‍ॅक्सिस बँकेच्या दारात अशोक पाटील हा सिगारेट ओढत मोबाईलवर बोलत असताना दोन दुचाकींवरून आलेल्या चौघा तरुणांपैकी दोघांनी पाटील यांच्या डोक्यात गोळ्या झाडून खून केला होता.

या खुनामुळे सुडाने पेटलेल्या पाटील गटाने खुनाचा बदला खून म्हणून आरोपी दिलीप जाधव याचा मेहुणा धनाजी गाडगीळ याचा दि. १३ डिसेंबर २०१३ ला पाचगाव येथे कोयता, खंजीर व तलवारीने सपासप वार करून खून केला होता. या पाचगाव ग्रामपंचायतीतील वर्चस्व वादातून झालेल्या या खून प्रकरणाच्या खटल्याकडे साऱ्या जिल्ह्याचे व राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले होते.

राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक एस. व्ही. शेलार यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र सत्र न्यायालयात सादर केले. या गुन्ह्यातील सर्व संशयित कळंबा मध्यवर्ती कारागृहात होते. 

टॅग्स :Courtन्यायालयMurderखूनkolhapurकोल्हापूर