शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

‘कोजिमाशि’च्या कर्ज व्याजदरात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्रश्न विचारण्यावरून होणारी झटापट, पोलिसांचा हस्तक्षेप, सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपामुळे नेहमी गाजणाºया ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या यंदाच्या सभेने मागील परंपरा खंडित केली. तब्बल अडीच तास झालेल्या विविध विषयांवरील चर्चेतून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपातीबरोबरच २५ लाखांच्या कर्जमर्यादेला सभेने मान्यता दिली. शेरोशायरी, ‘सोनू’ गाण्याने सभागृहातील वातावरण चांगलेच हलकेफुलके झाले.कोल्हापूर ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्रश्न विचारण्यावरून होणारी झटापट, पोलिसांचा हस्तक्षेप, सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपामुळे नेहमी गाजणाºया ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या यंदाच्या सभेने मागील परंपरा खंडित केली. तब्बल अडीच तास झालेल्या विविध विषयांवरील चर्चेतून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपातीबरोबरच २५ लाखांच्या कर्जमर्यादेला सभेने मान्यता दिली. शेरोशायरी, ‘सोनू’ गाण्याने सभागृहातील वातावरण चांगलेच हलकेफुलके झाले.कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी शाहू मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक मंदिर येथे झाली. अध्यक्षस्थानी सभापती संजय डवर होते. संस्थेचे तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी गेल्या अडीच वर्षांत केलेल्या वचनपूर्तीचा आढावा घेत, शेवटच्या सभासदाचे समाधान केल्याशिवाय सभा संपविणार नाही. शांततेने प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. सभापती संजय डवर यांनी तडाखेबंद प्रास्ताविकात सभासदांना खिळवून ठेवले. सभासदांची मागणी लक्षात घेऊन १ आॅक्टोबरपासून त्यांनी कर्जावरील व्याजदर अर्धा टक्क्याने कमी करण्याची घोषणा केली. कर्जातील काही रकमेची परतफेड केल्यानंतर त्याचा हप्ता कमी करण्याची मागणी दिलीप शेटे यांनी केली. यावर कायदा आडवा येतो, कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेऊ, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यानंी सांगितले. सोनेतारण योजना चांगली असली तरी त्यातून होणाºया फसवणुकीबाबत संस्थेने जागरूक राहण्याचा सल्ला संभाजी खोचरे यांनी दिला. एकाच वर्षात शाखा इमारती खरेदी करण्यामागे कारण काय? शाहूपुरी शाखा इमारत किती कोटींना घेतली, अशी विचारणा संजय पाटील यांनी केली. दहावी-बारावीमधील गुणवंतांबरोबर ‘नीट’, ‘जेई’ प्रवेश परीक्षांमधील गुणवंतांना पारितोषिक द्यावे, अशी मागणी प्रा. बी. डी. लोंढे यांनी केली. त्यास तत्काळ मंजुरी देण्यात आली.आपल्या खास शैलीत संजय परीट यांनी सभागृहातच ‘सोनू, तुझा दादावर भरोसा नाय काय...?’ हे गीत सादर करून विरोधकांना चांगलाच चिमटा घेतला. कर्जावरील व्याज दर कमी करण्याबरोबरचउच्चांकी नफ्याबद्दल दादासाहेब लाड व संचालकांच्या अभिनंदनाचा ठरावही यावेळी करण्यात आला. सी. बी. चव्हाण, धोंडिराम बाबर, डी. आर. पाटील, संजय ओमासे, अशोक मानकर, शिवाजी चौगुले, शंकरराव गुरव, मच्छिंद्र शिरगावकर, अंकुश कवडे, पी. आर. पाटील, राजेंद्र पाटील, शंकर पाटील, सरदार काळे, आर. बी. पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी केले. उपसभापती आनंदराव काटकर यांनी आभार मानले.महिलांची उपस्थितीआणि प्रश्नही!सभेत होणाºया गोंधळामुळे महिला सभासद सभेत प्रश्न विचारायचे राहू देत, उपस्थितही राहत नव्हत्या; पण या वेळेला बोटांवर मोजण्याइतक्या का असेना, पण महिला सभासद उपस्थित होत्या. त्यांतील हेमलता पाटील (खांडेकर हायस्कूल, कोल्हापूर) यांनी महिला दिनानिमित्त मुदतबंद ठेव पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. यावर ८ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत ही योजना येथून पुढे कायमस्वरूपी सुरू राहील, असे दादासाहेब लाड यांनी सांगितले.सभापतिपदाची खांडोळी नकोसभापतिपदाची सहा महिन्यांनी खांडोळी न करता अहवाल सालासाठी एकच सभापती असावा. दुसºया जिल्ह्यात बदली झालेल्या संचालकांनी नैतिकता स्वीकारून कार्यमुक्त व्हावे, अशी मागणी अण्णासाहेब चौगुले यांनी केली.