शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

कोडोली बाजारात ग्राहकांना माल तर विक्रेत्यांना ग्राहक मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST

रवींद्र पोवार लोकमत न्यूज नेटवर्क कोडोली : कोडोली येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रत्येक गुरुवारी भरला जाणारा आठवडा ...

रवींद्र पोवार

लोकमत न्यूज नेटवर्क

कोडोली : कोडोली येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रत्येक गुरुवारी भरला जाणारा आठवडा बाजार नियोजन अभावी सध्या अस्ताव्यस्त भरत आहे. त्यामुळे ग्राहकांना योग्य तो माल मिळत नाही आणि विक्रेत्यांना ग्राहक मिळेना, अशी अवस्था कोडोली बाजाराची झाली आहे. या सगळ्यांचा परिणाम व्यापाऱ्यांची संख्या घटण्यावर झाली आहे.

कोडोली येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून छत्रपती शिवाजी चौक परिसरात आठवडा बाजार भरविला जातो. येथे भाजीपाल्याबरोबरच धान्य, मिरची, मसाले, पादत्राणे, कपडे, कोंबडीसह जनावरांचा बाजार भरतो. त्यामुळे आठवड्याला लाखो रुपयांची उलाढाल बाजारात होते. त्यातून ग्रामपंचायतीला हजारो रुपये कराच्या रूपाने मिळत असले तरी बाजारातील सोयी-सुविधांकडे मात्र दुर्लक्ष पाहावयास मिळते. बाजारात येणाऱ्या विक्रेते, त्यांची वाहने व इतर वाहतूक सगळीकडे बेशिस्तपणा असल्याने सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो.

काखे, मोहरे, सातवे , सावर्डे तसेच सांगली जिल्यातील मांगले, शिराळा परिसरातून या चौकात वाहतूक येते. बाजारामुळे वहानधारकांना मार्ग काढताना दमछाक उडते. त्यातून छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. त्याचबरोबर भुरट्या चोरट्यांमुळे नागरिकांना त्रास होत असून बाजाराला शिस्त लावण्याबरोबरच चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पुढे येत आहे. (उद्याच्या अंकात पेठ वडगाव बाजार)

येथे भरू शकतो बाजार-

मुख्य मार्गालगत असणाऱ्या गल्लीत बाजार भरवावा. व्यवसायानुसार विक्रेत्यांचे वर्गीकरण करून त्यानुसार त्यांच्या बसण्याची व्यवस्था करून दिल्यास बऱ्यापैकी बाजारावरील ताण कमी होऊ शकतो. त्याचबरोबर आठवडी बाजारादिवशी अवजड वाहतूक इतर मार्गाने वळविणे व वाहनांचे पार्किंग व्यवस्था अंबाबाई मंदिर येथे करावी.

चौकट

सुविधांची वानवा

पन्हाळा तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून कोडोलीकडे पाहिले जाते. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यांतील विक्रेते व ग्राहक मोठ्या संख्येने बाजारात येतात. मात्र, बाजार आवारात एकही महिला स्वच्छतागृह नसल्याने महिलांची हेळसांड होत आहे.

कोट -

आठवडी बाजारादिवशी होणारी कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधत आहोत. मुख्य रस्त्यास जोडून असलेल्या गल्लीत बाजार भरविण्याचे नियोजन आहे. आगामी काळात स्वतंत्र भाजी मंडईसाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.

- नितीन कापरे (माजी सरपंच व विद्यमान सदस्य)

फोटो ओळी : कोडोलीचा आठवडी बाजार मुख्य रस्त्यावरच भरत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. (फोटो-१९०२२०२१-कोल-कोडोली)