शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दोन हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात, दोन पंटरही ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:49 IST

कोडोली : कोडोली येथील मंडल अधिकारी अरुण भानुदास माळगे यांना पंटरमार्फत दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ...

कोडोली : कोडोली येथील मंडल अधिकारी अरुण भानुदास माळगे यांना पंटरमार्फत दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी माळगेसह पंटर योगेश यशवंत गावडे (रा. कोडोली ) व सुशांत सुभाष चौगुले (रा. शहापूर) यांच्याविरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबतची माहिती अशी ,कोडोली येथील एका शेतकऱ्याची जमीन नावावर करण्यासाठी पन्हाळा येथे १० जानेवारीला रजिस्टर कार्यालयात बक्षीसपत्र दस्तऐवज केला होता. हा दस्त पुढील कार्यवाहीसाठी कोडोली येथील मंडल अधिकारी कार्यालयात आला होता. मंडल अधिकारी यांचा पंटर गावडे याने तक्रारदारांना मंगळवारी (दि. ११) कार्यालयात बोलावून घेतले. तक्रारदार बऱ्याच वेळ कार्यालयात थांबूनही माळगे भेटू न शकलेने ते निघून गेले. पुन्हा गावडे याने तक्रारदार यांना फोन करून शेतजमीन सातबारा पत्रकी नोंद करणेसाठी मंडल अधिकारी यांना २५०० रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. चर्चेअंती दोन हजारचा व्यवहार ठरला. बुधवारी सायकांळी ५ च्या सुमारास मंडल अधिकारी कार्यालयातच पंटरकडे दोन हजार रुपये देताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मंडल अधिकारी माळगे, पंटर योगेश गावडे व चौगले यांच्याविरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . पोलिस उपधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू साळुंखे , सुनील घोसाळकर, सचिन पाटील, संदीप पवार, गजानन कुराडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग