कोल्हापूरात हुडहुडी वाढली, पारा घसरला : किमान तापमान १५ डिग्री पर्यंत खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 18:39 IST2018-12-11T18:38:30+5:302018-12-11T18:39:34+5:30
कोल्हापूर जिल्ह्याचा पारा घसरला असून किमान तापमान १५ डिग्री पर्यंत खाली आल्याने हुडहुडी वाढली आहे. सकाळी व रात्री अंग गोठवणारी थंडी असल्याने घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे.

कोल्हापूरात हुडहुडी वाढली, पारा घसरला : किमान तापमान १५ डिग्री पर्यंत खाली
ठळक मुद्देकोल्हापूरात हुडहुडी वाढली, पारा घसरला किमान तापमान १५ डिग्री पर्यंत खाली
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचा पारा घसरला असून किमान तापमान १५ डिग्री पर्यंत खाली आल्याने हुडहुडी वाढली आहे. सकाळी व रात्री अंग गोठवणारी थंडी असल्याने घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे.
आॅक्टोबर पासून हिवाळा सुरू झाला असला तरी यंदा कडक थंडीचा अनुभव आलाच नव्हता. थोडी थंडी सुरू व्हायची तोपर्यंत वातावरणात बदल होऊन कमी व्हायची आणि मध्येच अवकाळी पाऊस पडत होता. त्यामुळे कोल्हापूरकरांना यंदा अंग गोठवणाऱ्या थंडीची अनुभूती आलीच नव्हती.