मंदिरात सिगरेट पिणाऱ्यांना हटकल्याने चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:23 IST2021-08-01T04:23:28+5:302021-08-01T04:23:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी : मडीलगे खुर्द (ता. भुदरगड) येथील डोंगरावरील जोतिबा मंदिरात मद्यधुंद अवस्थेत सिगारेट पीत येणाऱ्या पाच ...

Knife attack on smokers in the temple | मंदिरात सिगरेट पिणाऱ्यांना हटकल्याने चाकू हल्ला

मंदिरात सिगरेट पिणाऱ्यांना हटकल्याने चाकू हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी : मडीलगे खुर्द (ता. भुदरगड) येथील डोंगरावरील जोतिबा मंदिरात मद्यधुंद अवस्थेत सिगारेट पीत येणाऱ्या पाच तरुणांना हटकले म्हणून रागाने चाकूने हल्ला करून एकास जखमी केले. अजित राजाराम देसाई ( रा. गारगोटी ) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद भुदरगड पोलिसात नोंद झाली आहे.

अधिक माहिती अशी शुक्रवारी (दि ३०) रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास मडीलगे खुर्द येथील डोंगरावर जोतिर्लिंग मंदिरात अजित देसाई हे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी बेलवळे येथील विशाल ज्योतीराम इंगवले, आदित्य प्रकाश कांबळे, वैभव संजय कुंभार , शिवराम राजाराम कोळी, आकाश राजेंद्र पाटील हे सिगारेट ओढत मंदिरात येत असताना अजित देसाई यांनी त्या तरुणांना हटकले. या कारणावरून विशाल इंगळे याने त्याच्या कमरेला असलेला चाकू काढून अजित देसाई यांना तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून चाकूने छातीवर वार केला. त्यावेळी त्याच्या सोबतच्या इतरांनी त्याला मदत केली. अजित देसाई यांनी आरडाओरडा केल्यावर आसपास असलेल्या लोकांनी मद्यधुंद तरुणांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी अजित देसाई यांना गारगोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय मयेकर करीत आहेत.

फोटो १) विशाल इंगळे २) आदित्य कांबळे ३) वैभव कुंभार ४) शिवराम कोळी

Web Title: Knife attack on smokers in the temple