शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात त्र्यंबोली यात्रेतील वाट्यावरून चाकू हल्ला, दोघांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 12:51 IST

ही घटना शुक्रवारी सकाळी हॉकी स्टेडियमजवळ घडली

कोल्हापूर : येथील त्र्यंबोली यात्रेतील मटणाच्या वाट्यातील मुंडी घेण्यावरून झालेल्या वादावादीतून सईद अन्वर सलीम नायकवडी शानेदिवाण (वय २९,रा. म्हाडा कॉलनी हॉकी स्टेडियम) यांच्यावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी दोघांविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला. निहाल हजारे (पूर्ण नाव समजले नाही), गोट्या परब ( रा. बालाजी पार्क) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी हॉकी स्टेडियमजवळ घडली.पोलिसांनी सांगितले की, त्र्यंबोली यात्रेनिमित्त बकरी कापून वाटे देण्याचे काम हॉकी स्टेडियम बालाजी पार्क येथे शुक्रवारी पहाटे सुरू होते. सईद हे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हॉकी स्टेडियम येथे मटणाच्या वाट्याची वाट पहात असताना त्यांना एका मित्राने फोन करून ओंकार शिंदे व गोट्या परब यांच्यात मुंडीचा वाटा पाहिजे असल्याच्या कारणातून जोरदार वादावादी सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे सईद हे तत्काळ वाद सुरू असल्याच्या ठिकाणी गेले. त्यांने मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु गोट्या परब हा काही केल्या ऐकायला तयार नव्हता. तो सकाळी सात वाजण्याच्या सुमारास निहाल हजारे व अन्य १० ते १२ जणांसोबत पुन्हा म्हाडा कॉलनी येथील सईदच्या घराजवळ गेला. ओंकार कोठे आहे म्हणून पुन्हा शिवीगाळ करू लागला. सईद व त्याचा मित्र राहुल लोहार हे पुन्हा वाद सोडविण्याचा प्रयत्न करताना गोट्या परब व निहाल हजारे हे राहुल लोहारच्या अंगावर गेले. त्याला सोडवत असतानाच या दोघांनीही सईदवर चाकू हल्ला केला. या हल्यात सईद हे जखमी झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस